ETV Bharat / state

Ram Navami Mumbai: मुंबईच्या मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेत झाला राडा; पोलिसांनी केला लाठीचार्ज - Lathi charge by police

रामनवमीनिमित्त गुरूवारी अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली. अनेक ठिकाणी तणाव, दंगली घडल्याचेही दिसून आले. यावेळी मुंबईच्या मालवणी परिसरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रात्री दोन गटात हाणामारी झाली.

Ram Navami Mumbai
रामनवमी मिरवणुकीत दोन गटात हाणामारी
author img

By

Published : Mar 31, 2023, 9:15 AM IST

मुंबईच्या मालवणी परिसरात रामनवमी मिरवणुकीत दोन गटात हाणामारी

मुंबई : मुंबईत गुरुवारी रामनवमीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेत झालेल्या राड्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. उपनगरी मालाड (पश्चिम) येथील मालवणी येथे मिरवणुकीदरम्यान ही घटना घडली. त्यादरम्यान काही लोकांनी मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास आक्षेप घेतला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईच्या मालवणी परिसरात गुरूवारी हिंदूवादी संघटना बजरंग दलाकडून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

मिरवणूकीत दगडफेक : मुंबईच्या मालवणी परिसरातील गेट नंबर पाच परिसरात ही शोभायात्रा आली असता या ठिकाणी दोन गटात बाचाबाची झाली. मुंबई पोलिसांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आता परिस्थिती निवळली आहे. मात्र, परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे. मिरवणूकीत दगडफेक झाल्याचे शोभा यात्रेच्या आयोजकांचे म्हणणे आहे. घटनेनंतर पोलिसांनी जमावाला वेगळे केले. स्थानिक लोकांनीही जमावाला वेगळे केले.

घटनेनंतर दगडफेक आणि हाणामारी : भाजप नेत्यांनी मालवणी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. भाजप नेत्यांनी अनेक जखमी तरुणांना त्यांच्या वैद्यकीय अहवालांसह पोलीस ठाण्यात हजर केले. सध्या तरी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेनंतर दगडफेक आणि हाणामारीचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये दगडफेक करताना दगडफेक करणारा कैद झाला आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप पुष्टी दिली नाही. मालाडच्या मालवणी भागातील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न : या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. माहिती देताना डीसीपी म्हणाले की, रामनवमीच्या मिरवणुकीत काही अज्ञात लोकांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली, पण आम्ही लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत एकजण जखमी झालेला आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे. ते म्हणाले की, मिरवणुकीत सामील असलेल्या काही लोकांनी दगडफेक केल्याचा आरोप केला, त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली.

दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई : अतिरिक्त पोलीस कर्मचार्‍यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. या भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी परिसराला भेट दिली. त्यांनी शांततेचे आवाहन केले. त्यानंतर एका उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या समर्थकांनी मालवणी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करून दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात वाद : छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गुरूवारी रामनवमीनिमित्त मंदिरात तयारी सुरू असताना दोन गटात वाद झाला. तणावाची स्थिती निर्माण झाली होती. काही समाजकंटकांनी दगडफेक केली. तसेच पोलिसांसह खासगी वाहनांची जाळपोळ केली होती. किराडपुरा येथील राम मंदिरात ही घटना घडली. ही घटना रात्री दोन वाजल्याच्या सुमारास घडली होती. गोंधळ करणाऱ्या काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : Maharashtra Clashes : राममंदिराबाहेर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात वाद, 10हून अधिक वाहने पेटविली!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.