मुंबई - पत्रकारिता ही देशाचा चौथा आधारस्तंभ आहे. मात्र, सध्याची पत्रकारिता ही विचारांसह बातम्यांचे मिश्रण करणे म्हणजे हा प्रकार एक धोकादायक कॉकटेल आहे. अशाप्रकारे विचार आणि बातमीचे मिश्रण केल्याने त्यामधून पत्रकारिताचा खरा अर्थ लोकांसमोर येत नाही. पत्रकारिता करताना कोणावर अन्याय तर होणार नाही ना, याची आपण काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी केले. मुंबई प्रेस क्लबच्या रेड इंक अवॉर्ड 2021 या दहाव्या ऑनलाईन पुरस्कार सोहळ्यात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ( CJI Ramana in Mumbai Press Club Award )
...कर्तव्य बजावा -
वृत्त हे दिशाभूल करणारे नसावे. पत्रकारितेचे स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे. आपल्या पत्रकारितेचा समाजाला कसा फायदा होईल याचा विचार केला पाहिजे. तत्त्वे पाळली पाहिजेत. निःपक्षपाती, तथ्य-आधारित पत्रकारितेच्या गरजेवर भर दिला. वास्तविक अहवाल काय असावेत, याचा अर्थ आणि मते रंगत आहेत तो म्हणाला. कायदेशीर व्यावसायिकाप्रमाणेच पत्रकारालाही मजबूत नैतिक तंतू आणि नैतिक कंपास असणे आवश्यक आहे. या व्यवसायात तुमचा विवेक हाच तुमचा मार्गदर्शक आहे. तुम्ही कोणत्याही विचारसरणीचा दावा करता आणि तुमचा विश्वास कितीही प्रिय असला तरी त्यांच्या प्रभावात न पडता तुम्ही तुमचे कर्तव्य बजावले पाहिजे, असेही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात पत्रकारांनी जोखीम पत्करून काम केले. आरोग्य धोक्यात घातले. हे सगळे तुमच्यासाठी सोपे नाही, हे माहीत आहे. तुमच्या कुटुंबासाठी सोपे नाही हेदेखील माहीत आहे. तुमचे काम सोपे नाही. लोकशाहीची मूल्ये जपत आपण काम करत आहात, असे ते म्हणाले.
हेही वाचा - ST Employees Dismissed - आज ११६ निलंबित कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ७१९ वर
प्रेम शंकर झा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित -
ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रेम शंकर झा यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झा यांनी आजवर विश्लेषणात्मक लिखाण केले असून, काश्मीर, चीन, अशा अनेक विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या सोहळ्यात विविध माध्यमांतील प्रतिनिधींना त्यांच्या कार्याबद्दल विविध विभागांत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.