मुंबई Child Trafficking Case: विक्री करण्यात आलेल्या मुलीचा शोध घेतला असून दोन वर्षांपूर्वी विकलेल्या मुलाचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे. आरोपींच्या नातेवाईकांनीच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. (Kids Sold for Durgs) या तक्रारीनंतर शब्बीर समशेर खान, सानिया शब्बीर खान, उषा राठोड आणि शकील मकरानी या चौघांविरोधात विविध कलमांन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहेत. या गुन्ह्याचा तपास कक्ष 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक करीत आहेत. (child traffickers arrested)
ड्रग्जवरून व्हायची भांडणं: तक्रारदार महिला वांद्रे परिसरात राहत असून आरोपी वडील शब्बीर हा तिचा भाऊ आहे. तर सानिया शब्बीरची पत्नी आहे. ते दोघेही ड्रग्जच्या पूर्णपणे आहारी गेले आहेत. ड्रग्जच्या व्यसनामुळे त्यांच्यात भांडणं व्हायची. त्यामुळे शब्बीर आणि सानिया हे नणंद असलेल्या तक्रारदार महिलेचं घर सोडून वर्सोवा येथे सानियाच्या घरी म्हणजेच माहेरी राहायला गेले. तक्रारदार असलेल्या नणंदेने दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर आणि सानिया यांना चार वर्षांचा सुभान व दोन वर्षांचा हुसैन अशी दोन मुलं होती.
यांना केली अपत्यांची विक्री: 5 ऑक्टोबरला शब्बीर आणि सानिया यांना पैशाची चणचण भासू लागल्याने नवरा बायको दोघेही वांद्रे येथील नणंदेच्या घरी आले. यावेळी चिमुकला हुसैन आणि नवजात मुलगी ही दोन्ही मुले तिथे दिसली नाहीत. त्याबाबत तक्रारदार नणदेने दोघांकडेही वारंवार विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होती. सखोल विचारणा केली असता ड्रग्जच्या नशेकरिता पैसे नसल्यानं मुलगा हुसैन याची सुमारे दीड वर्षांपूर्वी आणि नवजात मुलीला जन्मतःच विक्री केल्याचं समोर आलं. चौकशीनंतर मुलगा हुसैन याला तिच्या मोठ्या बहिणीची जाऊ उषा राठोड हिच्या मदतीनं अंधेरी परिसरात अज्ञात व्यक्तीला साठ हजार रुपयांना विकल्याचं कळलंं. पैशांमधील दहा हजार रुपये उषा राठोड हिला कमिशन दिलं आहे. तर नवजात मुलीला डी एन नगर येथील डोंगर परिसरात राहणाऱ्या शकील मकरानी या व्यक्तीला 14 हजार रुपयांना विकल्याचं समोर आलं.
तिघांना अटक: यावरून तक्रारदार असलेल्या नणदेनं डी एन नगर पोलीस ठाण्यात स्वतःचा भाऊ शब्बीर समशेर खान आणि वहिनी सानिया खान त्याचप्रमाणे उषा राठोड आणि शकील मकरानी या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी शब्बीर आणि सानिया त्याचप्रमाणे मकरानी या तिघांना अटक केली. आरोपी उषा राठोड या महिलेचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.
हेही वाचा:
- Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाल गृहाच्या नावाखाली मुलांची विक्री करणाऱ्या संस्थेचा भांडाफोड; दामिनी पथकाची कारवाई
- Childe Labour In Tribal Areas : ठाणे, पालघर, नाशिकमध्ये वेठबिगारीसाठी मुलांची विक्री; आदिवासी भागात मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- दत्तक घेण्याच्या नावाखाली मुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ महिलांसह ५ जणांना अटक