मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 वाजता चित्रपट, मालिका निर्मात्यांसमवेत बैठक बोलावली आहे. तर दुपारी 1 वाजता प्रमुख उद्योजकांसमवेत बैठक होणार आहे.
ही बैठक ऑनलाईन होणार आहे. या बैठकीत मिनी लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत नक्की काय चर्चा होणार? याकडे लक्ष लागले आहे.
लोकल, बस प्रवासावर येणार निर्बंध?
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वाढत्या संक्रमणामुळे चिंतेची परिस्थिती उद्भवली आहे.नागरिकांकडून शासनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा लोकल, बस प्रवासावर निर्बंध लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या रविवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही नियमावली लागू करण्याची शक्यता आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली.
काल दिवसभरात आढळले 49,447 नवीन कोरोना रूग्ण
महाराष्ट्रात काल (3 मार्च) 49,447 नवे कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. नवीन 37821 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2495315 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 401172 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'तेव्हा ते लॉकडाऊनमध्ये सामील झाले आणि थाळ्या पिटण्याचा ''आनंद''ही घेतला'
हेही वाचा - स्त्री-पुरुष समानतेमध्ये भारताचे स्थान घसरले; बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूतानही पुढे