मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्थानक मेट्रो रेल्वेला लवकरच जोडले जाणार ( Metro Line 3 connect CSMT railway station ) आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होईल. त्याशिवाय प्रदूषण कमी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हमजे जलद प्रवास जनतेला करता येईल. असे शासनाकडून सांगण्यात येत आहे. लाखो वाहने रस्त्यावर चालतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते. मात्र मेट्रो रेल्वेमुळे वाहतूक कोंडी कमी ( Railway Station will connect with Metro Station ) होईल. कारण लाखो लोक मेट्रोमध्ये प्रवास करतील. त्यामुळे रस्त्यावरती वाहने कमी धावतील. त्यामुळे प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल, असा शासनाचा दावा ( Metro and local connect each other ) आहे.
प्रकल्प स्थिती : बहुचर्चित मुंबई मेट्रो मार्ग लाइन ३ एक्वा लाइन म्हणूनही ओळखळी जाते. हि ३३.५ किमी लांबीची पूर्णपणे भूमिगत लाईन आहे. दक्षिण मुंबईतील कफ परेड आणि उत्तर मुंबईतील सिप्झ आणि आरे यांच्यातील अंतर व्यापते. यात २६ भूमिगत मुंबई मेट्रो स्थानके आणि एक दर्जेदार स्टेशन असणार आहे. हा मुंबई मेट्रो मार्ग मुंबई विमानतळावरूनही जाईल. ज्यामुळे या प्रदेशातील कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळेल. या मार्गाच्या बांधकामासाठी एकूण २३,१३६ कोटी रुपये खर्च आला आहे. या मार्गावर लाईन १ मरोळ नाका आणि लाईन २ बीकेसी आणि लाईन ६ सिप्झ सह इंटरचेंज मार्ग ( Interchange routes of Metro ) असेल.
छत्रपती शिवाजी टर्मिनस मेट्रो लाईन तीनला जोडणार : मुंबई महानगरपालिकेच्या भुयारी मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर ( Metro Underground Line ) आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मुख्य आणि अत्यंत गर्दी असलेल्या स्टेशनला मेट्रोमार्गीका 3 साठी भुयारी मार्ग आता जोडला जाणार ( 3 local railway stations connect to Metro ) आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्गीका तीन रेल्वे स्थानकासाठी जय्यत तयारी सुरू आहे. एकूण या ठिकाणी सहा वेगवेगळे बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. या सहा भुयारी प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला प्रवाशांना जाता येईल.
मेट्रो रेल्वे स्थानकाचे काम प्रगती प्रथावर : अत्यंत गजबजलेले आणि सर्व उपनगरीय मार्गांना जोडणारे मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणजे दादर. दादरच्या जवळ सिद्धिविनायक, मेट्रो रेल्वे स्थानक याचे काम 85 टक्के पूर्ण झाले तसेच काळबादेवी देखील रेल्वे स्थानक त्याचेही काम वेगाने प्रगतीपथावर आहे. विधान भवनातून निघाल्यावर मेट्रो ने चर्चगेट हुतात्मा चौक असे देखील येताय तसेच काळबादेवी गिरगाव ग्रँड रोड मुंबई सेंट्रल महालक्ष्मी विज्ञान सेंटर आचार्य अत्रे चौक वरळी सिद्धिविनायक आणि दादर पर्यंत सहज येता येईल. आणि दादरवरून पुन्हा ज्यांना मुंबईची लोकल पकडून ठाणे अंबरनाथ बदलापूर, कर्जत, कसारा, जायचे आहे तसे देखील जाऊ शकतात. मेट्रो तीनच्या दुसऱ्या टप्प्यात दादर स्थानकावरून प्रवास करता येणार आहे. या ठिकाणच्या ट्रकचे काम शंभर टक्के पूर्ण झालेले आहे. येथील सिविल वर्क 87 टक्के पूर्ण झालेले आहे. तर सर्व सिस्टीम वर्क 44 टक्के झाले आहे. दादर मेट्रो रेल्वे स्थानकात भुयारी मार्गात सहा भिन्न वेगवेगळे प्रवेशद्वार केलेले आहेत आणि या ठिकाणाहून एक लाख 68 हजार 850 प्रवाशांची एकाच वेळेला ये जा करता येईल अशी सोय केलेली आहे.
भुयारी रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात : यासंदर्भात मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले की," छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक अत्यंत गजबलेल आहे. आता या रेल्वेस्थानकासोबत मेट्रो रेल्वे मार्गीका 3 रेल्वे स्थानक देखील जोडले जात आहे. अत्यंत सुनियोजित आणि अत्याधुनिक रीतीने या भुयारी रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो रेल्वे स्थानक थेट ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकांसोबत जोडल्या गेल्यामुळे एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना सहज सोप्या रीतीने ये जा करता येणार आहे. यामुळे वेळेची देखील बचत होणार आहे."