ETV Bharat / state

Mauritius Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार; १२ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावर - छत्रपती शिवाजी महाराज

मॉरिशसमधील मोका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फूट उंच अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.

Mauritius Chhatrapati Shivaji Maharaj Statue

author img

By

Published : Apr 29, 2023, 5:46 PM IST

मुंबई : अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे काल अनावरण करण्यात आले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर निनादला होता.

शिवाजी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव : यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजचा दिवस हा अतिशय भावनात्मक दिवस आहे. आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे उभारण्यात आला, याबद्दल मी मॉरिशसच्या पंतप्रधान, येथील मराठी समुदायाचा मनापासून आभारी आहे. तसेच आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच १२ कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या वतीने मी आपले आभार मानतो. आम्ही अनेक राजे पाहिले परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी, शौर्य, साहस हे अन्य कुणामध्ये नव्हते. म्हणूनच त्यांना 'श्रीमंत योगी' म्हटले जाते. जलसंवर्धन, समुद्री सामर्थ्य, किल्ले निर्मिती, प्रबंधन, अर्थव्यवस्था, कायदा-सुव्यवस्था इत्यादी क्षेत्रातील त्यांचे सामर्थ्य, चातुर्य हे सर्व आजही तितकेच मार्गदर्शक आहे. या पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठी ५ हजार कि.मी. दूर तुम्ही मला निमंत्रित केले हे भाग्य मला लाभले, असेही फडणवीस म्हणाले. महाराजांनी आपल्याला 'महाराष्ट्र धर्म' शिकविला. देव-देश आणि धर्मासाठी जगण्याची शपथ वयाच्या १४व्या वर्षी घेणारे आमचे हे आदर्श राजे आहेत. भारतीयांच्या मनामनात वीरतेचे बीजारोपण करण्याचे काम महाराजांनी केले असून मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो,असेही फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विविध घोषणांचे मॉरिशसच्या पंतप्रधानांनी यावेळी स्वागत केले. त्यांनीही यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव करणारे मनोगत व्यक्त केले.

मॉरिशसमधील १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती : याप्रसंगी मॉरिशसमधील मराठी मंडळी फेडरेशनला महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपये अर्थात ४४ दशलक्ष मॉरिशस रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याची घोषणा यावेळी केली. त्याच प्रमाणे मॉरिशसमधील १० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. मॉरिशसमधील मराठी, महाराष्ट्रीय बांधवांना राज्याशी सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अ‍ॅलन गानू, इतर मंत्री, मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला, मॉरिशस मराठी मंडली फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद हे प्रामुख्याने उपस्थित होते.

भारताबाहेर केलेला चौथा कार्यक्रम : देवेंद्र फडणवीस यांचा हा भारताबाहेर केलेला चौथा कार्यक्रम आहे. याअगोदर त्यांनी लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जपान मधील कोयासन विद्यापीठात भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशियात लोकार्पण केले होते. आता हा कार्यक्रम झाला आहे. याप्रसंगी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात आले. यामध्ये गोंधळ, पोवाडा, शेतकरी नृत्य इत्यादी मराठी प्रकारांचा समावेश होता.

हेही वाचा - APMC Results Live Update : राष्ट्रवादीच्या हाती सर्वाधिक, तर भाजपकडे २५ बाजार समित्या; अमरावतीत राणांचा धुव्वा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.