ETV Bharat / state

सनशाईन एंटरप्रायझेस कारखाना आग प्रकरण; मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत - छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Fire Case : छत्रपती संभाजीनगर येथील कारखान्याला रविवारी पहाटे लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. या आगीत भाजून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
author img

By PTI

Published : Dec 31, 2023, 7:56 PM IST

मुंबई/छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Fire Case : छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरातील सनशाईन एंटरप्रायझेस युनिटमध्ये पहाटे एक वाजता आग लागली होती. त्यावेळी तेरा कामगार आत झोपले होते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या आगीतून सात जणांनी हातमोजे युनिटच्या टिनचं छत तोडून स्वत:चा बचाव केलाय, तर सहा जणांचा मृत्यू झालाय.

5 लाख रुपये मदत देण्याचे निर्देश : मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच जखमींचा वैद्यकीय खर्च उचलण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटलंय. तसंच या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलंय. रविवारी पहाटे 3.30 वाजता ही आग विझवण्यात आली, असं एक अधिकाऱ्यानं सांगितलंय.

सहा मृतदेह बाहेर काढले : अग्निशमन विभागाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी सांगितलं की, जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात हातमोजे बनवण्याचा कारखाना आहे. पहाटे एकच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तोपर्यंत आग संपूर्ण कारखान्यात पसरली होती. पाच जण आत अडकल्याचं स्थानिकांनी सांगितलं. आमचे अधिकारी कारखान्यात पोहोचले, पण तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. आम्ही सहा मृतदेह बाहेर काढले आहेत. कारखान्यात आग लागली, तेव्हा कारखान्यात काम करणारे 10-15 कामगार आत झोपले होते. आगीचे लोळ पाहून कामगारांमध्ये घबराट पसरली. काही लोक तेथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर काही आतमध्ये अडकले, असं एका कामगारानं सांगितलं.

कामगारांना बाहेर काढण्यात यश : हे सर्व कामगार बिहारमधील असल्याची माहिती मिळतेय. ते सर्व कामानिमित्त इथ आले होते. या कंपनीत हातमोजे बनवण्यात येत होते. त्यामुळं कंपनीकडं कच्च्या मालाचा साठा मोठ्या प्रमाणात होता. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पहाटे चार वाजता काही कामगारांना बाहेर काढण्यात यश आलंय. जखमी कामगारांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सहा जणांचा मृत्यू : एका प्रत्यक्षदर्शी कामगाराच्या म्हणण्यानुसार, कामगार बिहारमधील मिर्झापूर येथील होते. त्यापैकी दोघांचे प्राण वाचवण्यात यश आलं. मात्र, कंपनीत अडकलेल्या भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांच्यासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

हेही वाचा -

  1. जयंत पाटलांमुळं महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, आमदार संजय शिरसाट यांचा दावा
  2. नववर्षाच्या स्वागतासाठी साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, पाहा व्हिडिओ
  3. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल, साई मंदिर आज राहणार रात्रभर खुलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.