ETV Bharat / state

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय - Chhatrapati Sambhaji Maharaj

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगाबादचे नाव बदलाबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. तर शिवसेना यासाठी पहिल्यापासून आग्रही आहे.

Aurangabad Airport
छत्रपती संभाजी महाराज
author img

By

Published : Mar 5, 2020, 8:39 PM IST

Updated : Mar 5, 2020, 9:42 PM IST

मुंबई - औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना सुखद धक्का देणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाचे नाव 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे करून औरंबादच्या शिवसैनिकांना सुखद धक्का दिला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगाबादचे नाव बदलाबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

हेही वाचा - बेकायदा 'पॅथॉलॉजी लॅब'ला आळा घालण्यासाठी लवकरच नवीन कायदा - अमित देशमुख

शिवसेना गेली अनेक वर्षे औरंबाबादचे, संभाजीनगर असे नामकरण करावे, अशी मागणी करत आहे. तसेच शिवसेनेच्या मुखपत्रातही औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला जातो. पण, या शहराचे नाव बदलायचे काय झाले? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यावर माजी खासदार खैरे यांनी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नावावरून जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे राजकारण अनेक वेळा तापले आहे. विशेषतः युतीच्या ताब्यात असलेल्या या शहराचे नाव बदलणार, असे प्रत्येक निवडणुकीत सेना-भाजपने जाहीर केले. मात्र, मुद्दा तापत राहिला, नाव काही बदलले गेले नाही. औरंगाबाद विमानतळ निर्माण झाल्यावर त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. मात्र, विमानतळाला नाव देण्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अनेकवेळा राजकारण तापलेले पाहायला मिळाले.

विमानतळाला काँग्रेसकडून माजी खासदार रफिक झाकरिया यांचे नाव द्यावे, अशी मागणी होती तर शिवसेनेकडून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावी अशी मागणी होती. राज्यात युती तुटल्यावर शहराचे नाव बद्दलण्यावरून भाजपने सेनेची कोंडी करायला सुरुवात केली. त्यात आता शहराचे नाही, तर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शहरात शिवसेनेकडून आनंद व्यक्त केला जात असला तरी शहराचे नाव बद्दलण्यावरून राजकारण पुन्हा तापेल यात काही शंका नाही.

हेही वाचा - पालिका सभागृहात भाजपचा गोंधळ, विरोधी पक्षनेतेपदी प्रभाकर शिंदेंची घोषणा करण्याची मागणी

Last Updated : Mar 5, 2020, 9:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.