ETV Bharat / state

नारायण राणेंचे प्रश्न दिल्लीतच सुटतील; चंद्रकांत पाटलांनी केले हात वर

स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी राणे हे स्वाभिमानी नेते आहेत, ते खासदार असल्याने त्यांचे प्रश्न दिल्लीतील नेतेच सोडवतील, अशी माहिती दिली.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Mar 5, 2019, 8:25 PM IST

मुंबई - स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे एनडीएचे घटक आहेत. सध्या त्यांचे प्रश्न हे राज्याच्या हातात नसून दिल्लीतले नेते त्यांचा प्रश्न सोडवतील, असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही राणे यांनी युतीतील घटक पक्ष शिवसेनेवर टीका केली. युतीच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच राणे यांनी आपले पुत्र माजी खासदार निलेश राणे यांची उमेदवारी घोषित केल्याने, भाजप पुढे पेच निर्माण झाला आहे. तसेच शिवसेनेच्या सर्व अटी मान्य करत भाजपने सेनेला युतीत सामावून घेतले आहे. या स्थितीत ही राणे शिवसेनेला लक्ष करत असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनाला आणल्यानंतर त्यांनी याबाबत ठोस बोलणे टाळले. राणे हे स्वाभिमानी नेते आहेत, ते खासदार असल्याने त्यांचे प्रश्न दिल्लीतील नेतेच सोडवतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.

नारायण राणे यांनी केवळ सिंधुदुर्गची जागाच नाही तर अन्य ५ ठिकाणी स्वाभिमान पक्षाचे उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. राणे आणि शिवसेना यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत. मात्र, या संबंधांचा युतीवर परिणाम होऊ नये, याची काळजी घेताना भाजपची दमछाक होत असल्याचे भाजपच्या अनेक नेत्यांनी खासगीत कबुल केले आहे.

Intro:नारायण राणे यांचे प्रश्न दिल्लीतच सुटतील, चंद्रकांत पाटील यांनी केले हात वर.....

मुंबई 5

स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे एनडीएचे घटक असून सध्या त्यांचे प्रश्न हे राज्याच्या हातात नसून दिल्लीतले नेते त्यांचा प्रश्न सोडवतील अशी आशा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्या नंतर ही नारायण राणे यांनी युतीतील घटक पक्ष शिवसेनेवर टीका करण्यात खंड पाडला नाही. युतीच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच राणे यांनी आपले पुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी उमेदवारी घोषित केल्याने, भाजप पुढे पेच निर्माण झाला आहे. तसेच शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढत सर्व अटी मान्य करत भाजपने सेनेला युतीत सामावून घेतले आहे. या स्तिथीत ही राणे शिवसेनेला लक्ष करत असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनाला आणल्या नंतर त्यांनी याबाबत ठोस बोलणे टाळले. नारायण राणे हे स्वाभिमानी नेते आहेत, ते खासदार असल्याने त्यांच्या विषय इथला नाही , दिल्लीतले नेतेच त्यांचे प्रश्न सोडवतील अशी हतबलता पाटील यांनी व्यक्त केली आहे.
नारायण राणे यांनी केवळ सिंधुदुर्ग ची जागाच नाही तर अन्य पाच ठिकाणी स्वाभिमान पक्षाचे उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. राणे आणि शिवसेना यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत. मात्र या संबंधांचा युतीवर परिणाम होऊ नये, याची काळजी घेताना भाजपची दमछाक होत असल्याचे भाजपच्या अनेक नेत्यांनी खाजगीत कबुक केले आहे. Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.