ETV Bharat / state

Maharashtra Gold Mine : राज्याच्या दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी? मुख्यमंत्र्यांचा दुजोरा

author img

By

Published : Dec 2, 2022, 1:14 PM IST

चंद्रपूर आणि सिंधुदुर्गात सोन्याचे ब्लॉक असल्याची शक्यतेला मुख्यमंत्र्यांनी दूजोरा दिला. राज्यात सोन्याच्या दोन खाण असण्याची माहिती सध्या समोर येते ( Gold Mines In Maharashtra ) आहे. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सोन्याच्या खाणींबाबात केलेला उल्लेख सगळ्यांचे लक्ष वेधणारा ( Chances Of Gold Mines In Maharashtra ) ठरला. चंद्रपूर व सिंधुदुर्गात सोन्याचे ब्लॉक असल्याचे त्यांनी म्हटले ( Maharashtra Likely To Have Two Gold Mine ) आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री? : महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दृष्टीने शोध घेण्याचे काम सुरु असल्याचीही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याबाबतच्या माहितीला दुजोरा ( Gold Mines At Chandrapur Sindhudurga ) दिला. राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनेही असू शकते असे आता बोलले जाते आहे. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचेही सांगितले जाते आहे. या दृष्टीने आता चाचणीही सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादा भुसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

कोठे आहेत सोन्याचे ब्लॉक? : महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत. अशी माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हे सोने निघाले तर ती महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. सोन्याचे हे दोन ब्लॉक विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणतील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असल्याचेही सांगितले जात आहे. राज्याच्या भूगर्भात जर खनिजांचा साठा आढळून आला तर देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरु केला जाऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त ( CM Eknath Shinde )केला.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.