ETV Bharat / state

मालगाडीच्या इंजनमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळ झाली होती विस्कळीत - मध्य रेल्वेची वाहतूक काही वेळ झाली होती विस्कळीत

मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ मालवाहून रेल्वे गाडीच्या इंजनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कसाराच्या दिशेकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल आहे. काही वेळानंतर बिघाड झालेले इंजिन मध्य रेल्वेच्या कारशेडकडे रवाना करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

c
c
author img

By

Published : Sep 22, 2021, 3:00 AM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकाजवळ मालवाहून रेल्वे गाडीच्या इंजनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची कसारा दिशेकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल आहे.

दुसरे इंजिन जोडून गुड्स ट्रेन मार्गस्थ

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) दुपारी 2 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास आसनगाव स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहोचून बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही इनिंज सुरू होत नव्हते. अखेर दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सुमारास दुसरे इंजिन जोडून या मालगाडीला मार्गस्थ करण्यात आली. मात्र, तांत्रिक बिघाड झालेले इंजिन मध्य रेल्वेच्या कारशेडमध्ये आणण्यात आले आहे. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड कसा झाला याची चौकशी मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाकडून करण्यात येत आहे.

प्रवाशांचे झाले हाल

मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे सेवा संथगतीने सुरू होती. दिवसभर पावसाची ये-जा सुरू होती. त्यामुळे लोकलही उशिराने धावत होत्या. तर, मध्य रेल्वेवरील आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे कसारा दिशेकडे जाणाऱ्या दोन लोकल आणि दोन मेल-एक्सप्रेस खोळंबल्या होत्या. मात्र, इंजिन कारशेडकडे रवाना केल्यानंतर या गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांचे हाल झाले.

हेही वाचा - फुकट्या प्रवाशांची आता खैर नाही, एसटीची तपासणी मोहीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.