ETV Bharat / state

मध्य रेल्वे मान्सूनपूर्व तयारीसाठी सज्ज, पावसाळ्यात सुरळीत सेवेसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी

दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे वाहतूक या ना त्या कारणाने विस्कळीत होत असते. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे रेल्वे विभागाला पावसाळ्यापूर्वी विविध उपाययोजना करणे शक्य झाले आहे. येत्या पावसाळ्यात सेवा सुरळीत व विना व्यत्यय चालण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने काही उपाययोजना केल्या आहेत.

author img

By

Published : May 17, 2020, 8:53 AM IST

मध्य रेल्वे मान्सूनपूर्व तयारीसाठी सज्ज
मध्य रेल्वे मान्सूनपूर्व तयारीसाठी सज्ज

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्याने मध्य रेल्वेची सेवा ठप्प होते. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे मुंबईत विशेषत: उपनगरीत रेल्वेच्या नेटवर्कवर सुरळीत व काटेकोरपणे पावसाळापूर्व काम करणे मध्य रेल्वेला शक्य झाले आहे. येत्या पावसाळ्यात सेवा सुरळीत व विना व्यत्यय चालण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने खाली दिलेल्या उपाययोजना केल्या आहेत.

नाले व गटारातील घाण काढून टाकणे - मुंबई उपनगरामध्ये सामाजिक अंतर राखून नाले साफ करण्यासाठी व नाल्यांतून घाण काढण्यासाठी 16 जेसीबी, पोकलेन्स तैनात आहेत. पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत 90 किमी गटाराची व पुलांची साफसफाई पूर्ण केली आहे. या लॉकडाउन कालावधीत 3 बीआरएन मक स्पेशल्स आणि 2 ईएमयू मक स्पेशलद्वारे पुरेसा ब्लॉक घेऊन मक, मलब्याची विल्हेवाट करण्यात आली आहे.

नाल्यांचे रुंदीकरण - मुसळधार पावसात पाण्याचे मुक्त प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी आणि पूरग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या कुर्ला कारशेड, वडाळा आणि टिळक नगर येथे पुलांच्या रुंदीकरणाची अनेक कामे पूर्ण केली आहेत.

पंपांची तरतूद - मध्य रेल्वेने पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाचा जलद निचरा होण्यासाठी हेवी ड्युटी डिझेल व इलेक्ट्रीक पंप उपलब्ध करुन देण्याची योजना आखली आहे. जेणेकरून पावसाळ्याच्या काळात रेल्वेची वाहतूक खंडित न होता सुरळीत रहावी.

ट्रॅक्शन वितरण शाखा - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची ट्रॅक्शन वितरण शाखा पॉवर ब्लॉक संचालित करून गाड्यांच्या सुलभ संचालनासाठी क्रॉसओव्हर, टर्नआउट्स, मास्ट्स, कॅन्टिलवर्स इत्यादींची देखभाल सुनिश्चित करत आहे. ट्रेन सुलभ चालण्याच्या दृष्टीने टॉवर वॅगन व पायी पेट्रोलिंगद्वारे विभागांतील ओव्हरहेड उपकरणांची लाइव्ह लाईन चेकिंग केली जात आहे.

खराब झालेले पोर्टल बूम बदलणे - घाट विभागातील 47 बोगदा ओएचई ओव्हरहॉलिंग, संपूर्ण मुंबई विभागातील रोड ओव्हर ब्रीज, पादचारी पुलाखालील गंभीर तपासणी आणि देखभाल करणे. उच्च-दाब जेटच्या इन हाऊस तंत्रज्ञानाद्वारे साफ करणारे इन्सुलेटर, आसनगाव-कसारा विभागात खराब झालेले 17 पोर्टल बूम आणि 34 अपराईट मास्टस काढण्यात आले. या विभागात एकत्रित ब्लॉक मार्जिन फारच कमी आहे, ट्रॅक्शन वितरण विभागाने हे मास्ट काढण्यासाठी लॉकडाउन कालावधी वापरला आहे. या कामाची अंमलबजावणी करताना योग्य शारीरिक अंतर राखले गेले आहे. तसेच, साइटवरील सर्व कर्मचारी मास्क आणि सॅनिटायझर्स वापरही करताहेत.

इलेक्ट्रिकल जनरल - 22 केव्ही, 3 एमव्हीए ट्रान्सफॉर्मरची साफसफाई व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टीएमएस सबस्टेशन, पॉवर पॅनेल व पार्सल बिल्डिंगमधील लाइट पॅनेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मधील साफसफाई व बाहेर जाणारे कनेक्शन घट्ट करणे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्मवरील सर्व रेक्टिफायर्स, सैल कनेक्शन क्लिनिंग व घट्ट करणे तसेच जाणारे कनेक्शनचे तापमान मोजले जात आहे. मुंबई विभागातील विविध ठिकाणी पंपचे ओव्हर हाऊलिंग व नादुरुस्त पंपकडे लक्ष दिले जात आहे.

घाट विभाग - कोसळणारे दरड स्कॅन करण्यासाठी दरड मटेरियल ट्रेन चालवण्यात येतात. यामध्ये, सैल दरड ओळखण्यासाठी हिल टोळीचे संचालन, बोगद्यामध्ये स्कॅन, ध्वनीकरण ट्रॅकवर पडलेल्या दरडीपासून बचाव करण्यासाठी बोगद्याजवळ पोलाद रचनांची उभारणी इ.

सिग्नल आणि टेलिकॉम - संपूर्ण मुंबई विभागातील केबलचे पूर्ण मेगर्निंग, पावसाळा सज्जतेचा भाग म्हणून 96 पॉईंट मशिन्स सील केल्या आहेत. 2 स्थानकांवर पॅनेल टेस्टिंग, पॉइंट मशिन्स आणि सिग्नल युनिट बदलणे देखील पार पडले.

मान्सून खबरदारी पुस्तिका - रेल्वे कर्मचार्‍यांसाठी मान्सून पुस्तिकादेखील तयार आहे. या पुस्तिकेत पावसाळ्याशी संबंधित तपशील असतील.

समन्वय सभा - पुढील समन्वय बैठका महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत होत आहेत. तसेच, यावर्षी पावसाळ्याच्या तयारीच्या भागाच्या रूपात मध्य रेल्वेने अनेक नवीन उपक्रम राबविले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.