ETV Bharat / state

Railway earns Rs 57crore : मध्य रेल्वेने भंगारातून कमावले ५७ कोटी २९ लाख रुपये ! - झिरो स्क्रॅप मिशन

मध्य रेल्वे नेहमीच नावीण्यपुर्ण उपक्रम राबवित असते. मध्य रेल्वेने झिरो स्क्रॅप मिशनतंर्गत (Central Railway earns) चालू वर्षात भंगाराच्या विक्रीतून ५७ कोटी २९ लाख ( Rs 57 crore 29 lakh from scrap ) रुपयांची कमाई केली आहे.

earns Rs 57.29 crore from scrap
भंगारातून कमावले ५७ कोटी
author img

By

Published : Jun 6, 2022, 10:32 PM IST

मुंबई: मध्य रेल्वेने (Central Railway) प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” (Zero scrap mission) आखला. तो साध्य करण्यासाठी प्रयत्न केले. या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रुळ, पर्मनंट वे सामग्री, वापरात नसलेले डबे, वॅगन आणि लोकोमोटिव्ह आदींचा समावेश आहे. चालू वर्षात एप्रिल ते मे २०२२ दरम्यान, मध्य रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून ५७.२९ कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत म्हणजेच एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत ९.२१ कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत ५२२.०४% अधिक आहे.

मध्य रेल्वेने प्राप्त केलेला महसूल इतक आर्थिक वर्षात भंगाराच्या विक्रीतून मिळालेला महसूला पेक्षा सर्वाधिक आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळत नाही, तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. "शून्य स्क्रॅप मिशन" चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या सर्व विभाग, कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.