ETV Bharat / state

मध्य रेल्वेला चित्रपटाच्या शुटिंगमधून १ कोटी ३३ लाखांची कमाई - चित्रपटाचे चित्रीकरण

२०१९- २० या वर्षात मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर २१ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले असून, यातून १.३३ कोटी रुपये उत्पन्न रेल्वेने कमावले आहे.

film shooting
film shooting
author img

By

Published : Mar 19, 2021, 3:54 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेची रेल्वे स्थानके नेहमीच चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वात लोकप्रिय आहे. २०१९- २० या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर २१ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते. या चित्रीकरणातून १.३३ कोटी रुपये उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ८ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले असून, त्या माध्यमातून ४४.५२ लाख रुपयांचा महसूल मिळाला. सर्वाधिक उत्पन्न हे एकट्या पुणे विभागातून मिळाले आहे.

film shootingरेल्वे स्थानकावर चित्रीकरण

कोट्यवधी रुपयांची कमाई-
मध्य रेल्वेने २०१९-२० मध्ये २१ चित्रपटांच्या चित्रीकरणातून १.३३ कोटी रुपये उत्पन्न मिळविले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक येथे ‘पंगा’ चित्रपटासह ८ चित्रपटांच्या चित्रीकरणातून ४४.५२ लाख, आपटा स्थानकात ४ फिल्म चित्रीकरणातून २२.६१ लाख रूपये उत्पन्न मिळाले. पनवेल स्थानकात रजनीकांत स्टारर फिल्म ‘दरबार’ कडून सर्वाधिक २२.१० लाख उत्पन्न मिळविले. पुणे विभागातील निसर्गरम्य वाठार स्थानकात सलमान स्टारर ‘दबंग 3’ याच्या परवानगी आणि शुल्कासाठी १५.६२ लाख यासह ३ चित्रपटांमधून ३७.२२ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. पुणे ते मुंबई दरम्यान ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचे चित्रीकरण, तुर्भे आणि वाडीबंदर यार्ड, पुणे स्टेशन यासारख्या चित्रपटाच्या शूटिंग ठिकाणांमधूनही चांगले उत्पन्न मिळाले.

film shooting
चित्रपटाचे चित्रीकरण

तिन्ही ऋतूंमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण-
मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर तिन्ही ऋतूंमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असते. २०१९-२० मध्ये वेगवेगळ्या स्थानकांवर लघुपट, मालिका, चित्रपट, वेगवेगळ्या खासगी कंपन्यांच्या जाहिरातींचे चित्रीकरण होत आहे. तसेच चित्रपट निर्मात्यांची आवश्यकता पूर्ण करणार्‍या अनेक सुंदर चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी मध्य रेल्वे मार्गवरील अनेक स्थळ/ स्थानके आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापासून आपटा,पनवेल, चौक, लोणावळा, खंडाळा, वाठार, सातारा आणि तुर्भे आणि वाडी बंदरसारख्या लोकप्रिय रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.

आपटा रेल्वे स्थानकाला पसंती-
चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चित्रपट निर्मात्यांची सर्वाधिक पसंती ही मध्य रेल्वेवरील आपटा रेल्वे स्थानकालाच आहे. २०१९-२०२० या वर्षात आपटा रेल्वे स्थानकावर 'रात अकेली है', 'मुंबई सागा' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' यासह चार चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते.'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है', 'रंग दे बसंती', 'बागी', 'खाकी', 'शादी नंबर 1' आणि 'चायना टाऊन' या लोकप्रिय चित्रपटांची दृश्य आपटा स्थानकावर कॅमेर्‍याबद्ध करण्यात झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.