मुंबई - आज मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे आज हाल होणार आहेत. सकाळी ११ वाजून २० मिनीटे ते ३ वाजून ५० मिनीटापर्यंत माटुंगा ते मुलुंडदरम्यान आणि हार्बर मार्गावर सकाळी ११ वाजून ४० मिनीटे ते सायंकाळी ४ वाजून १० मिनीटापर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन आणि चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी मार्गावर मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर आज सकाळी १० वाजून ५७ मिनीट ते सायंकाळी ३.५२ मिनीटापर्यंत माटुंगा येथून सुटणाऱ्या सर्व धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावरून धावतील. या गाड्या विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकात थांबणार नाहीत. सकाळी ११ ते ५ दरम्यान सीएसएमटीमधून सुटणाऱ्या सर्व लोकल १० मिनिटे उशिराने धावतील. कर्जत-खोपोली दरम्यान दुरुस्तीकामांसाठी दुपारी 2 पर्यंत पॉवर ब्लॉक असणार आहे.
सीएसएमटी - वडाळा रोड ते वाशी बेलापूर - पनवेल, सीएसएमटीहून वांद्रे- गोरेगावला जाणाऱ्या लोकलसेवा रद्द राहतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.