ETV Bharat / state

Mumbai Rains : पावसाळ्यात प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष उपाययोजना - रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी

मुंबईत पाऊस झाल्यानंतर त्याचा फटका रेल्वेला बसतो. त्यामुळे अनेक लोकलच्या प्रवाशांचा खोळंबा होत असल्याने दरवर्षी रेल्वेला पावसाळ्यात योग्य नियोजन करावे लागते. यावर्षी मध्य रेल्वेने पावसामुळे रेल्वे प्रवासी सेवा खोळंबणार नाही, यासाठी नियोजन केल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली.

Central Railway
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 27, 2023, 7:00 AM IST

Updated : Jun 27, 2023, 8:31 AM IST

मुंबई : पावसाळ्यात मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासनाने समन्वय साधत योग्य उपाययोजना केल्याने गेल्या वर्षी मुंबईची लाइफलाईन थांबली नाही. यावर्षीही मध्य रेल्वेने पावसाळ्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेतली आहे. मध्य व हार्बर मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका असणाऱ्या ठिकाणी आरपीएफच्या फ्लड रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्या आहेत. बदलापूर, ठाणे, माटुंगा, कुर्ला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी प्रत्येकी एक अशा पाच बोटी पाच स्थानकांजवळ तैनात करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ शिवराज मानसपुरे यांनी दिली आहे.

डॉ शिवराज मानसपुरे, रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी

६२ हजार क्युबिक मीटर कचरा साफ : दरवर्षी पावसाळ्यात विशेष करून मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर अनेक कारणांनी प्रवाशांची गैरसोय होत असते. ती टाळण्यासाठी यंदा मध्य रेल्वे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. पावसाळ्यात ओव्हरहेड वायरवर तुटने, झाड कोसळण्याचा घटनांचा धोका जास्त असतो. त्यामुळे यंदा मध्य रेल्वे मार्गावरील 50 ठिकाणी झाडांची छाटणी करण्यात आली, 88 कल्हर्टर साफ केली गेली आहेत. तसेच रुळांखालून जाणारी गटारे जोडण्यात आल्यामुळे यंदा रुळांवर पाणी जमा होण्याचा धोका फार कमी आहे. मध्य व हार्बर मार्गावरील कल्हर्टर व गटार साफ करण्यात आली आहेत. यंदा 62 हजार क्युबिक मीटर कचरा रेल्वे हद्दीतून उचलण्यात आला आहे.

धोका टाळण्यासाठी वॉटरप्रूफ केबल : दरवर्षी प्रमाणे यंदाही कंट्रोल रूम 24 बाय 7 कार्यरत राहणार आला आहे. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलीस आदी यंत्रणांशी समन्वय साधत आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या मदतीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. दरवर्षी पावसाळ्यात केबलमध्ये पाणी जाऊन धोका उत्पन्न होतो. त्यामुळे यावर्षी पाणी जमा होऊन काही आपत्कालीन परिस्थिती ओढावू नये, यासाठी केबल वॉटरप्रूफ केल्या गेल्या आहेत. रेल्वे हद्दीत पडणाऱ्या पावसाची दर 1 तासाला नोंद होणार असून, पावसाची नोंद अधिक झाल्याचे निर्दशनास येताच मध्य रेल्वेची यंत्रणा त्वरित कार्यरत होईल, असेही शिवराज मानसपुरे यांनी सांगितले आहे.

पाणी उपशासाठी 166 पंप : मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रुळांवर पाणी जमा होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र याबाबत यंदा जास्त दक्षता घेण्यात आली आहे. जमा झालेल्या पाण्याचा वेळीच उपसा करण्यासाठी मस्जिद बंदर, दादर, सँडहर्स्ट, परळ, माटुंगा, दिवा, सायन, कळवा, वडाळा, टिळक नगर, चुनाभट्टी आदी ठिकाणी एकूण 166 पंप बसवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी या पंपांची संख्या 150 इतकी होती. यंदा पंपांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून 12.5 व 100 हॉर्स पावरचे पंप बसवण्यात आल्याचेही मानसपूरे यांनी सांगितले आहे. तसेच मध्य रेल्वेवर 75 लाउड हेलर, दोरी व चमकणारी टेप, 90 शिडी 318 नग 5 वॅटच्या वॉकीटॉकी, 100 रेनकोट, 225 चमकदार जॅकेट, 250 एलईडी लाईट यासह मध्य रेल्वे सज्ज झाले आहे.

पूर बचाव पथक तैनात : 14 आरपीएफ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले रेल्वे पूरबचाव पथक यावर्षी तैनात करण्यात आले आहे. या पथकाला पुण्यातील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) कडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे पथक पूरप्रवण भागात तैनात केल्याचेही शिवराज मानसपुरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -

  1. पावसाचे पाणी उपसण्यासाठी रेल्वे मार्गावर २९१ उच्च वॅटेज पंप बसविणार
  2. Heavy Rains Thane : ठाण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी; रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली

Last Updated : Jun 27, 2023, 8:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.