मुंबई - मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांकडून कंगना रणौतवर टीका केली जात आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांनीही कंगनावर टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणामध्ये आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. कंगनाला आरपीआय संरक्षण देईल, असे म्हणत त्यांनी कंगनाच्या पाठीशी आपण असल्याचे म्हटले आहे.
-
लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल@KanganaTeam@CMOMaharashtra @rautsanjay61
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल@KanganaTeam@CMOMaharashtra @rautsanjay61
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 4, 2020लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल@KanganaTeam@CMOMaharashtra @rautsanjay61
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 4, 2020
लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना रणौतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना रणौतला आरपीआय संरक्षण देईल, असे ट्विट आठवले यांनी केले आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला टीका-टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगनाने मुंबईवर टीका केली नसून राज्य सरकारवर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगनाला भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगनाला संरक्षण देईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगनाला धमकी देणे योग्य नाही. कंगनाला सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की, सुरक्षा यंत्रणांवरून राज्य सरकारवर केलेली टीका असो, याप्रकरणी कंगनावर तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेणे योग्य नाही. कंगनाला मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगनाचे संरक्षण करील, असा इशारा आठवले यांनी आज दिला.
हेही वाचा - कंगनाच्या मुंबईबद्दलच्या कांगाव्याने नव्या वादाला जन्म! पाहा घटनाक्रम थोडक्यात...
हेही वाचा - "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच.. मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा"