मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे राधिका मर्चंटसोबत साखरपुडा नुकताच पार पडला आहे. अनंत आणि राधिकाचा एंगेजमेंट सोहळा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घर अँटिलिया येथे पार पडला. अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंटच्या निमित्ताने अँटिलिया सजला आहे. अनंत आणि राधिका यांनी गोल धना आणि चुनरी पद्धतीच्या जुन्या परंपरेने लग्न केले. यावेळी मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. यावेळी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिची मुलगी आराध्या, गौरी खान आणि तिचा मुलगा आर्यन खान आणि किरण राव यांच्यासह अनेक मान्यवरांंनी अंबानी यांच्या अँटिलिया येथील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तसेच, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि त्यांच्या आई रश्मी ठाकरे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
![अनंतची झाली एंगेजमेंट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17528650_ambani.jpg)
गोल धाना गुजराती विवाहांचा खास विधी : या जोडप्याने बुधवारीच एक दिवस आधी मेहंदी सेरेमनी साजरी केली आहे. गेल्या वर्षी 29 डिसेंबरला राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात दोघांचा रोका सोहळा झाला होता. दरम्यान, गोल धाना हा गुजरातींचा पारंपरिक विधी आहे. हा विधी वराच्या घरात होतो. यादरम्यान, वधू पक्ष वराच्या घरी भेटवस्तू आणि मिठाई पाठवतात. यासोबतच कोथिंबीर आणि गूळही एकमेकांना दिला जातो. यानंतर गोल धाना सोहळा होतो असे हे पारंपारिक विधी आहेत.
![अनंतची झाली एंगेजमेंट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17528650_ambani2.jpg)
कसा झाला कार्यक्रम : साखरपुड्याचा सोहळा सुरू करण्यासाठी अनंत अंबानी यांची बहीण ईशा अंबानी आधी मर्चंट हाऊसमध्ये गेल्या आणि संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी त्यांना आणि राधिका यांना आमंत्रित केले. अंबानी कुटुंबाने आरती आणि मंत्रोच्चारात मर्चंट कुटुंबाचे स्वागत केले.
यानंतर दोन्ही कुटुंबीय अनंत आणि राधिकाला मंदिरात घेऊन गेले, जेथे दोघांनी भगवान कृष्णाचे आशीर्वाद घेतले. यानंतर सर्वजण समारंभाच्या ठिकाणी पोहोचले, जिथे गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. आधी लग्न पत्रिका वाचण्यात आली.
भेटवस्तू येथेच गोल धाना व चुनरी विधी पार पडला. यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्या. त्यानंतर नीता अंबानी यांच्या पुढाकारात अंबानी कुटुंबाने जबरदस्त सरप्राइज परफॉर्मन्स दिला, ज्याचे सर्वांनी कौतुक केले.
यानंतर ईशा अंबानी यांनी रिंग सेरेमनीच्या सुरुवातीची घोषणा केली. राधिका आणि अनंत यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमोर आणि मित्रांसमोर अंगठ्यांची देवाणघेवाण केली आणि सर्वांकडून आशीर्वाद घेतले.
![राधिका यांचा साखरपुडा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17528650_ambani3.jpg)
गुजरातमधील आहेत राधिकाचे वडील : विरेन मर्चंट हे गुजरातच्या कच्छचे रहिवासी आहेत. ते एडीएफ फूडस लिमिटेडचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तसेच एनकोअर हेल्थकेअर प्रा. लिमिटेडचे सीईओ आणि उपाध्यक्ष आहेत. राधिकाने आपले शालेय शिक्षण कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल तसेच मुंबईच्या इकोले मोन्डिएल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केले. राजकारण आणि अर्थशास्त्रात न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवी घेतली.
![राधिका यांचा साखरपुडा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17528650_ambani4.jpg)
कंपनी संचालक, शास्त्रीय नृत्यांगनाही : पदवीनंतर राधिका भारतात परतली होती. ती आता एनकोअर हेल्थकेअरच्या मंडळात संचालक आहे. तिला ट्रॅकिंग आणि स्विमिंग खूप आवडते. ती एक प्रशिक्षित शास्त्री नृत्यांगनाही आहे. राधिकाने मुंबईतील श्री निभा आर्ट डान्स अकादमीच्या गुरू भवन ठाकर यांच्या मार्गदर्शनात शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
![अनंतची झाली एंगेजमेंट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17528650_ambani5.jpg)
बालपणापासूनच अनंत-राधिका एकमेकांना ओळखतात : राधिका आणि अनंत बालपणापासूनच एकमेकांना ओळखतात. अनंत यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डाचे सदस्य म्हणून काम केले. ते सध्या आरआयएल एनर्जी बिझनेसचे नेतृत्व करतात.
हेही वाचा : आलियाच्या हॉलिवूड पदार्पणाचा हार्ट ऑफ स्टोन ऑगस्टमध्ये होणार प्रदर्शित