ETV Bharat / state

सायरस मिस्त्री अपघाती मृत्यूप्रकरण, अनाहिता पांडोलेंविरुद्ध गुन्हा दाखल

कासा पोलिसांनी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातादरम्यान गाडी चालवणाऱ्या अनाहिता पांडोलेंविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती दारियस पांडोलेंचा जबाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

author img

By

Published : Nov 5, 2022, 5:42 PM IST

Updated : Nov 5, 2022, 6:18 PM IST

अनाहिता पांडोलेंविरुद्ध गुन्हा दाखल
अनाहिता पांडोलेंविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई - कासा पोलिसांनी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी 304(A), 279, 336, 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपघातादरम्यान गाडी चालवणाऱ्या अनाहिता पांडोलेंविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती दारियस पांडोलेंचा जबाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. या अपघातात जखमी झालेल्या अनाहिता पांडोले यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत. दारियस पांडोळे यांनी पोलिसांना सांगितले होते की, त्यांची पत्नी डॉ. अनाहिता तिसर्‍या लेनमधून कार चालवत असल्याने त्यांना दुसऱ्या लेनमध्ये जाता येत नाही. त्यांच्यापुढे जात असलेल्या दुसर्‍या एका कारने लेन बदलली होती. मात्र अचानक ट्रक पाहून अनाहिता तिसर्‍या लेनवरून गाडी दुसऱ्या लेनवर आणू शकल्या नाही. यादरम्यान गाडी पुलाच्या रेलिंगला धडकली आणि अपघात झाला.

अनाहिता पंडोले चालवित होत्या कार - पोलिसांचे म्हणणे आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची कार 4 सप्टेबरला दुपारी २.२१ च्या सुमारास पोस्टजवळ दिसत होती. चेकपोस्टपासून 20 किमी अंतरावर असलेल्या सूर्या नदीवरील पुलावर दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांच्या अहवालानुसार, ही घटना घडली तेव्हा अनाहिता पंडोले टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची आलिशान कार चालवत होत्या. या अपघातात प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोळे बचावले. मात्र मिस्त्री आणि दारियस यांचा भाऊ जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. मुंबईपासून सुमारे 120 किमी अंतरावर दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

सायरस मिस्त्रींच्या डोक्यावर मार बसला होता. मृत्यूचे कारणही तेच असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. तसेच अपघात होताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. जहांगीर पंडोल यांचाही घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. दोघांना जेव्हा रुग्णालयात घेऊन आले, तेव्हा दोघांचाही मृत्यू झाला होता. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय व्यक्ती, उद्योगपती, सहकारी, मित्र यांना धक्का बसला होता.

धडकण्यापूर्वी भरधाव वेगात कार - पोलिसांच्या प्राथमिक तपास अहवालात त्यांची आलिशान कार दुभाजकाला धडकण्यापूर्वी भरधाव वेगात असल्याचे समोर आले होते. इतकेच नाही तर मागच्या सीटवर बसलेल्या दोन्ही व्यक्तींनी सीट बेल्टही घातला नव्हता. पोलिसांच्या अहवालानुसार, चेकपोस्ट ओलांडल्यानंतर त्यांच्या कारने अवघ्या 9 मिनिटांत 20 किमीचे अंतर कापले असेल. यावरुन चालक भरधाव वेगाने कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते.

Last Updated : Nov 5, 2022, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.