ETV Bharat / state

सातारा लोकसभा पोटनिवडणूक: उदयनराजेंच्या गडाला राष्ट्रवादी देणार का हादरा?

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. २१ ऑक्टोबरला विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. या  निवडणुकीबरोबरच आणखी एका ठिकाणच्या जागेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. ती म्हणजे सातारा लोकसभा पोटनिवडणूक.

सातारा लोसकभा पोटनिवडणूक
author img

By

Published : Sep 26, 2019, 12:36 PM IST

Updated : Sep 26, 2019, 4:45 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. २१ ऑक्टोबरला विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीबरोबरच आणखी एका ठिकाणच्या जागेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. ती म्हणजे सातारा लोकसभा पोटनिवडणूक. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे आता उदयनराजेंविरोधात कोण निवडणूक लढवणार हा चर्चेचा विषय ठरत आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले हे निवडून आले होते. मात्र, त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम ठोकला. आता पुन्हा उदयनराजे भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांनीच निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची मागणी
सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मागे अद्यापही साताऱ्यातील जनता असल्याचे दिसून आले. पवारांच्या सभेला मोठा प्रतिसाद यावेळी मिळाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जोरदार फटकेबाजी केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीची साथ सोडमार कधी खासदार होत नसल्याचे वक्तव्य करत त्यांनी उदयनराजेंना लक्ष्य केले.

पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चाचपणी
काँग्रसेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही काँग्रेसकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. मात्र, चव्हाण यांनी मी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे पुण्यात म्हटले होते. त्यामुळे चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले असले तरी पक्षाने आदेश दिल्यास चव्हाण काय निर्णय घेणार हेही महत्वाचे ठरणार आहे.

श्रीनिवास पाटील
सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील हेही येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजें ऐवजी श्रीनिवास पाटील यांना तिकीट द्यावे, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली होती. मात्र, शरद पवार यांनी उदयनराजे यांनाच तिकीट दिले. पवारांच्या आदेशामुळे राष्ट्रवादीच्या नाराज आमदारांनी देखील उदयनराजेंचे काम केले. मात्र, आता उदयनराजे भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी श्रीनिवास पाटलांच्या नावाचा विचार करु शकते.

शशिकांत शिंदे
उदयनराजेंच्या विरोधात कोरेगावचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आणि शरद पवारांचे विश्वासू मानले जातात. सातारा जिल्ह्यामध्ये त्यांची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा आहे.

नरेंद्र पाटलांची भूमिका
युतीमध्ये सातारा लोकसभेची जागा ही शिवसेनेकडे आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्वी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर साताऱ्याची जागा शिवसेनेची असल्याने पाटील यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढवली होती. यामध्ये उदयनराजेंनी त्यांचा पराभव केला होता. आता या पोटनिवडणुकीत नरेंद्र पाटलांची भूमिका काय असणार हेदेखील महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. ते जो उमेदवार ठरवतील त्याचे काम करणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

कमळाच्या चिन्हावर उदयनराजेंचा २ वेळा पराभव
उदयनराजेंनी दोन वेळा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १९९९ ला उदयनराजेंनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. तर २००४ साली उदयनराजेंनी लोकसभा लढवली होती. यामध्येही त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 26, 2019, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.