अमरावती - उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय अमरावती या उपक्रमांतर्गत शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी प्राध्यापक आणि पालकांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि एकूण तक्रारींपैकी चार हजार 89 तक्रारींचे निराकरण केले.
एअर इंडियाचा मालकी तब्बल 68 वर्षानंतर पुन्हा एकदा टाटांकडे - latest news
22:54 October 01
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या 4 हजार 89 तक्रारींचे निराकरण
18:54 October 01
ब्रेक द चैन : मुंबईत धार्मिक स्थळे सुरु करण्यासाठी 50 टक्के उपस्थिती आवश्यक
मुंबई - ब्रेक द चैन अंतर्गत मुंबईत धार्मिक स्थळे सुरु करण्यासाठी धार्मिक स्थळांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. कोविड नियमांचे पालन करावे.
नियमाची अंमलबजावणी न झाल्यास साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाई होणार असल्याचे परिपत्रक मुंबई महापालिकेने जारी केले आहे.
16:52 October 01
पैनगंगा नदीत पोहायला गेलेले दोन तरुण गेले वाहून
वाशिम - जिल्ह्याच्या महागाव येथे पैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक वाहून गेले. अंकुश लांडे आणि वैभव खोडके अशी युवकांची नावे आहेत. गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते दोघे वाहून गेले होते. या दोघांचा ग्रामस्थांकडून शोध सुरू होता, दरम्यान वैभव खोडके वाहून जात असताना त्याच्या हाताला एक झाड लागले. त्यामुळे तो वाचला असून आज पहाटे तो घरी परतला. मात्र अंकुश लांडे हा युवक अजूनही बेपत्ता आहे.
14:53 October 01
परमबीर सिंग प्रकरणात गृहमंत्री वळसे-पाटील यांनी बोलावली बैठक
मुंबई - परमबीर सिंग प्रकरणात गृहमंत्री वळसे पाटील यांनी बैठक बोलावली आहे. मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांसोबत गृहमंत्री वळसे पाटील यांची बैठक होणार आहे. परमबीर सिंह यांच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्यांसंदर्भात माहिती घेणार असल्याची माहिती आहे.
13:00 October 01
आजाराच्या खर्चाला कंटाळून पाच वर्षाच्या मुलाला बापाने पंचगंगा नदीत फेकून दिले
कोल्हापूर ब्रेकिंग
पाच वर्षाच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाला कंटाळून बापाने मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार इचलकरंजीत उघडकीस आला. बापाचे नाव सिकंदर हुसेन मुल्ला असे आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. या पाच वर्षाच्या मुलाचा पोलीस शोध घेत आहेत. लहान मुलांची क्रूरपणे हत्या केल्याची जिल्ह्यातील ही चौथी घटना असून हातकणंगले तालुक्यातील तिसरी घटना असल्याने नागरिक हादरून गेले आहेत.
12:20 October 01
मुंबई -
महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) कोविड दरम्यान शैक्षणिक शुल्क माफ करण्यासह त्यांच्या मागण्यांसाठी राज्यभरात अनिश्चित काळासाठी संप सुरू केला आहे.
'आम्हाला लेखी आश्वासन हवे आहे. आम्ही आपत्कालीन सेवा बंद केली नाही, जेणेकरून रुग्णांच्या सेवेमध्ये तडजोड होणार नाही. शैक्षणिक शुल्क माफ केले पाहिजे. कारण कोविड दरम्यान कमी शैक्षणिक चालू होते. वसतीगृहाची परिस्थिती चांगली नाही आणि BMC डॉक्टरांच्या वेतनातून कर कापत आहे', असे मार्डचे सदस्य डॉ. अक्षय यादव यांनी म्हटलं.
'महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) शुक्रवारपासून (1 ऑक्टोबर) राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे. आमची प्राथमिक मागणी आहे की शैक्षणिक शुल्क माफ केले पाहिजे. वसतीगृहाची परिस्थिती सुधारली पाहिजे कारण ती चांगली नाही. बीएमसी रुग्णालयांच्या निवासी डॉक्टरांच्या मानधनातून टीडीएस कापला जाऊ नये. मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांनी आम्हाला या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावले. पण आम्हाला लेखी आश्वासने हवी आहेत', असंही अक्षय यादव यांनी म्हटलं.
12:17 October 01
जळगाव -
जळगावातील गिरणा नदीवरील कांताई बंधारा गेला वाहून
अतिवृष्टीमुळे गिरणा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने बंधारा गेला वाहून
नदीला पूर आलेला असताना कांताई बंधाऱ्याचे गेट ओपन न केल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते
या घटनेत बंधाऱ्या जवळील केबिनसह आऊट हाऊस वाहून गेले
तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात आले होते
जैन कंपनीने सामाजिक दायित्वातून हा बंधारा बांधला होता
12:10 October 01
नवी दिल्ली -
एअर इंडियाचा लिलाव
टाटा सन्सने राष्ट्रीय वाहक एअर इंडियासाठी बोली जिंकली
टाटा सन्स सर्वाधिक बोली लावणारे होते
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने या बोलीला मंजुरी दिली
त्यामुळे आता टाटा ग्रुप एअर इंडियाचा नवा मालक बनला
11:13 October 01
मुंबई -
गेल्या तीन ते चार दिवसांपासून गोरेगाव आरे कॉलनीमध्ये धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद
बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश
गेल्या 15 दिवसात 7 वेळा बिबट्याचे वेगवेगळ्या व्यक्तींवर हल्ले
फिल्म सिटी परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्या जेरबंद
11:10 October 01
मुंबई -
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून पूरग्रस्त मराठवाडा दौऱ्यावर जाणारा
- पूरग्रस्त मराठवाड्यातील परिसराचे पंचनामे करण्याआधी गरज पोहोचली पाहिजे
- पंचनाम्याआधी मदत करा
-राज्य सरकारच्या घोषणा हवेत विरल्या, अद्याप कोणत्याही पूरग्रस्ताला मदत मिळाली नाही, असे फडणवीसांनी म्हटले.
10:18 October 01
मुंबई -
मुंबई नार्कोटीक्सने कुणाल जानीला खार येथून ड्रग प्रकरणात अटक केली
ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर कुणाल बराच काळ फरार होता
त्याच्यावर हॉटेलमध्ये हायप्रोफाईल ड्रग पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे
08:57 October 01
मुंबई -
गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनी परिसरात युनिट नंबर 7, फिल्म सिटी रोडवर काही वेळापूर्वी सुनील मैदान नावाच्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला. गोरेगाव आरे कॉलनीमध्ये गेल्या 7 दिवसात बिबट्याने हल्ला केल्याच्या 4 घटना घडल्या आहेत. तर गेल्या 15 दिवसात बिबट्याने 7 जणांवर हल्ले केले आहेत. दरम्यान, आरेत आता बिबट्या कधी कोणावर हल्ला करेल याचा नेम नाही. गोरेगाव (पूर्व ) आरेमध्ये युनिट नंबर ३ च्या सरकारी निवासस्थान येथे राहात असलेल्या कुमार आयुष यादव या ४ वर्ष वयाच्या बालकावर बिबट्याने २६ तारखेला रात्री साडेआठ वाजता हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा काल रात्री आरे मध्यवर्ती कार्यालय विसावा येथे आठच्या सुमारास बिबट्याने पाठीमागून येत महिलेवर जोरदार हल्ला केला. मात्र, मोठ्या धाडसाने त्या महिलेने बिबट्याशी लढा देऊन त्याला पळवून लावले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
08:04 October 01
मुंबई -
अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वेळगे यांच्यावर निलंबनाची कारवाई
एका महिन्यापूर्वी अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रत्ना पार्क बारमध्ये सहार पोलिसांनी रेड टाकली होती
याच प्रकरणांमध्ये यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे
06:46 October 01
मुंबई - डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, याबाबत राज्य सरकार उदासीन असल्याने कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आजपासून (1 ऑक्टोबर) राज्यातील सुमारे 5 हजार निवासी डॉक्टर संपावर जात असल्याची माहिती महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना म्हणजेच मार्डने दिली. राज्यभरात निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील (ओपीडी) सेवा बंद राहणार आहेत.
06:14 October 01
मुंबई - आरे कॉलनीत पुन्हा एकदा बिबट्याचा मुलावर हल्ला
मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील आरे कॉलनीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) दोन खंडणीखोर नेत्यांना पोलिसांनी पैसे घेताना रंगेहाथ अटक केली. सूर्यप्रकाश भदर्गे (उपाध्यक्ष मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) आणि रेखाताई मोरे (जिल्हा उपाध्यक्ष उत्तर-पश्चिम मुंबई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.