ETV Bharat / state

ब्रेक दि चेनचे निर्बंध, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले आहे. आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

Mumbai
Mumbai
author img

By

Published : Apr 15, 2021, 6:00 PM IST

मुंबई - राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले आहे. आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

प्रश्न : घरकाम करणारे, वाहनचालक, स्वयंपाकी कामावर येऊ शकतात का? रेल्वे, बसेसने प्रवास करू शकतात का?

उत्तर- प्रत्येक शहरांत संसर्गाची वेगेवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे याबाबतीत स्थानिक प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावयाचा आहे.

प्रश्न : मुव्हर्स अ‌ॅन्ड पॅकर्सच्या मदतीने घरसामान स्थलांतरित करू शकतात का?

उत्तर - अतिशय अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक प्रशासन याला परवानगी देईल. मात्र सर्वसामान्यरित्या याचे उत्तर नाही असेच आहे.

प्रश्न : महाराष्ट्रांतर्गत खासगी वाहनाने प्रवास शक्य आहे का?

उत्तर - ब्रेक दि चेनच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे, की कोणत्याही योग्य व आवश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये. तुम्ही सार्वजनिक वाहनाचा उपयोग करून एका ठिकाणाहून/स्थानकाहून दुसरीकडे जाऊ शकता.

प्रश्न : वाइन शॉप्स आणि सिगारेट दुकाने उघडी असतील का?

उत्तर - नाही. केवळ आवश्यक गटातील दुकानेच उघडी राहू शकतील.

प्रश्न : लोक सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकलिंग करू शकतात का?

उत्तर - नाही.

प्रश्न : सिमेंट, स्टील हे बांधकाम साहित्य खुलेपणाने मिळणार का?

उत्तर - आदेशात नमूद केल्याप्रमाणे संबंधित बांधकाम स्थळ सुरू ठेवण्यास परवानगी असेल तर बांधकाम साहित्य ने-आण करता येईल. साहित्यांची ऑर्डर ऑनलाइन किंवा दूरध्वनीवरून देता येईल. मात्र कुठलेही बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही.

प्रश्न : कुरियर सेवा सुरू राहील का?

उत्तर : फक्त आवश्यक कारणांसाठी कुरियर सेवा सुरू राहू शकेल.

प्रश्न : प्राणी तसेच लोकांसाठी मदतीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे काय?

उत्तर - स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेशिवाय त्यांना काम सुरू ठेवता येणार नाही.

प्रश्न : वस्त्रोद्योग आणि कापड उद्योग सुरू ठेवता येईल?

उत्तर - नाही.

प्रश्न : १९ एप्रिल रोजी होणारी एमबीबीएस परीक्षा होईल का?

उत्तर - परीक्षा आयोजित करण्याविषयी संबंधित विभाग योग्य तो निर्णय घेईल. मात्र विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच्या आधारे ये-जा करता येईल. तसेच प्रौढ व्यक्तीबरोबर असेल तरी मान्यता दिली जाईल.

प्रश्न : आवश्यक इ-कॉमर्स म्हणजे नेमके काय?

उत्तर - सर्व प्रकारच्या वस्तू व सेवा ज्या आवश्यक गटात येतात उदा. किराणा, औषधी, अन्न पदार्थ इत्यादी इ कॉमर्स मार्फत वितरित केल्या जाऊ शकतात.

प्रश्न : प्लम्बर, सुतार, वातानुकूलन, फ्रिज तंत्रज्ञ, पेस्ट कंट्रोल व इतर घरगुती सामानाची दुरुती करणारे येऊ शकतात का?

अगदी टाळण्यासारखे नसेल तर पाणी आणि वीज याबाबतीत सेवा देणाऱ्या व्यक्ती ये-जा करू शकतात. त्याचप्रमाणे पेस्ट कंट्रोल, घर स्वच्छता, उपकरण दुरुस्ती खूप आवश्यक असले पाहिजे. त्याची तत्काळ निकड हवी.

यावर केवळ निर्बंध टाकायचे म्हणून टाकलेले नाहीत, तर नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे. मग त्यात ती सेवा पुरविणारी व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय देखील आलेच. त्यामुळे या दिलेल्या सवलतीचा विचारपूर्वक आणि अत्यावश्यक असेल तरच उपयोग करावा. अन्यथा या सवलतीवरदेखील निर्बंध आणावे लागतील.

प्रश्न : दातांचे दवाखाने सुरू राहतील का?

उत्तर - होय

प्रश्न : स्टेशनरी, पुस्तकांची दुकाने सुरू राहतील का?

उत्तर - नाही

प्रश्न : ट्रॅव्हल कंपन्या व सेवा सुरू राहतील का? ट्रॅव्हल, पासपोर्ट, व्हिसा सेवांचे काय?

उत्तर- ट्रॅव्हल एजन्सीज दुकान सुरु ठेवून काम करू शकणार नाहीत. मात्र ऑनलाइन काम करू शकतात. आपण एक खिडकी योजनेतील सर्व सुविधा जसे की व्हिसा, पासपोर्ट सेवा, सर्व शासकीय सेतू केंद्रे सुरू ठेवण्यासाठी शासनाचा एक भाग म्हणून मान्यता दिली आहे.

प्रश्न : आवश्यक सेवा व सुविधांना सुरु ठेवण्यासाठी सहाय्यभूत उद्योग सुरू राहू शकतील का?

उत्तर - "essential for essential is essential" म्हणजेच आवश्यकसाठी आवश्यक ते आवश्यक हे तत्व आहे. तरी देखील काही संभ्रम असल्यास उद्योग विभागाचा निर्णय अंतिम राहील.

प्रश्न : कामाच्या ठिकाणाजवळ राहणारे कामगार आणि कर्मचारीच उद्योग-कंपनीत येऊ शकतात का? इतर भागातून व गावांतून कामाच्या ठिकाणी येणाऱ्यांनासुद्धा परवानगी आहे?

उत्तर - १३ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशात आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना परवानगी आहे. त्यामुळे तेथील कामगार व कर्मचारी ये-जा करू शकतात. इतर कारखाने व उद्योगांच्या बाबतीत ज्या कामाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केलेली असेल आणि तिथून त्यांच्या प्रवासाची स्वतंत्र व्यवस्था असेल ते उद्योग सुरु राहू शकतात.

प्रश्न : आयातदार व निर्यातदार यांना परवानगी दिली आहे. मात्र या निर्यातदारांना कामासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या वस्तू किंवा सेवा देणारे सुरू ठेवू शकतील का?

उत्तर - नाही. केवळ आवश्यक वस्तूंची आयात करणे अपेक्षित आहे. इतर आयात वस्तुंचा साठा करून ठेवावा लागेल. निर्यातीच्या बाबतीत अगोदरच तयार करून ठेवलेल्या वस्तूंची निर्यात करता येईल. निर्यात करणाऱ्या वस्तुंच्या उत्पादनाबाबत बोलायचे तर केवळ निर्यातीची जी पुरवठा ऑर्डर असेल त्या मर्यादेतच उत्पादन करता येईल. काही अडचण असल्यास उद्योग विभाग मार्गदर्शन करेल.

प्रश्न : उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परत परवानग्या घ्याव्या लागतील की पूर्वीच्या परवानग्या वैध असतील?

उत्तर - उद्योगांना सुरू राहण्यासाठी १३ एप्रिल २०२१च्या आदेशाप्रमाणे पूर्तता करणे गरजेचे आहे.

प्रश्न : आवश्यक वस्तूंचा पुरवठा दुकानांना करण्यासाठी त्या व्यक्तीस रॅपिड अँटीजेन चाचणी करावी लागेल का?

उत्तर - नाही

प्रश्न : काही आवश्यक वस्तू जसे की अन्न पदार्थ हे उपाहारगृहामार्फत किंवा ई कॉमर्समार्फत रात्री ८ नंतर घरपोच वितरित करता येईल का?

उत्तर - १३ एप्रिलच्या आदेशान्वये आवश्यक सेवा आणि सुविधांवर तसेच घरगुती पुरवठा करण्यावर बंदी नाही. या सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांच्या कामांना स्थानिक प्रशासनाने रात्री ८ नंतर काम करण्यास परवानगी दिली असेल तर घरी पुरवठा ( होम डिलिव्हरी) रात्री ८ नंतर करता येईल. स्थानिक प्रशासन वेळेमध्ये आवश्यकता भासल्यास लवचिकता ठेऊ शकते.

प्रश्न : रस्त्यावरील खाद्यविक्रेते दुकान सुरू ठेवू शकतील?

उत्तर - सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत पार्सल आणि घरगुती वितरणास मान्यता देण्यात आली आहे. (या प्रकारात होम डिलिव्हरी फारशी होत नाही)

प्रश्न : खूप मोठ्या गृहनिर्माण संस्थेत संपूर्ण सोसायटी मायक्रो कंटेनमेंट जाहीर केली जाऊ शकते का?

उत्तर - सोसायटीच्या परिसरात ५पेक्षा जास्त व्यक्ती कोविडग्रस्त आढळ्यास ते क्षेत्र मायक्रो कंटेनमेंट घोषित करावे लागेल. जर गृहनिर्माण संस्था खूप मोठी असेल तर स्थानिक प्रशासन याबाबतीत रुग्णांचे अंशतः विलगीकरण क्षेत्र कारण्याबाबतीत नियोजन करू शकेल. कंटेनमेंट घोषित करण्यामागचा मूळ उद्देश या क्षेत्रात प्रवेश करणारे आणि बाहेर जाणाऱ्यांवर नियंत्रण आणणे आणि इतरत्र संसर्ग फैलावणार नाही यासाठी तो भाग वेगळा करणे होय. कंटेनमेंटसाठीची एसओपी तंतोतंत पालन केली जावी.

प्रश्न : स्थानिक प्रशासन दुसऱ्या कोणत्या मुद्द्यांवर नव्याने आदेश निर्गमित करू शकतील?

उत्तर - स्थानिक प्रशासन अपवादात्मक म्हणून काही सेवा आवश्यक गटात अंतर्भूत करून परवानगी देऊ शकतील. मात्र यासाठी त्यांनी संपूर्ण विचारांती आणि अपवादात्मक परिस्थितीत हा निर्णय घ्यावयाचा आहे.

स्थानिक प्रशासनास त्यांना गरज वाटली तर संसर्ग झपाट्याने पसरविणारी काही स्थळे व ठिकाणे बंद करण्याचे अधिकार असतील. उपाहारगृहे आणि बारसाठी स्थानिक प्रशासन वेळा ठरवेल आणि कोविड संसर्ग लक्षात घेऊन सुधारितही करू शकतील. लोकांच्या सोयीसाठी ते वेळा वाढवू देखील शकतील. मात्र कुठलेही असे आदेश निर्गमित करण्याअगोदर राज्य शासनाची मंजुरी घेणे आवश्यक असेल.

प्रश्न : पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा पेट्रोल पंप्स, एव्हिएशन स्टेशन्स, एलपीजी बॉटलिंग प्लांट हे आवश्यक सेवेत येतात का?

उत्तर - हो

प्रश्न : औषधी उत्पादनांची यंत्रसामुग्री आणि उपकरणे यांच्या उद्योगांना मान्यता आहे का?

उत्तर- होय

प्रश्न : आवश्यक सेवा ही फक्त सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीतच सुरू राहील का?

उत्तर - आवश्यक सेवा आठवड्याचे २४ तास सुरू राहील (स्थानिक प्रशासनाने या गटातील सेवा काही इतर कायद्यान्वये वेळा ठरवून दिली असेल तर त्या वेळेत त्यांना सुरु ठेवता येईल). मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्यात यासंदर्भात काही निर्बंध नाहीत.

प्रश्न : सर्वसामान्य नागरिक लोकलने प्रवास करू शकतील का?

उत्तर - होय, आदेशात दिलेल्या वैध कारणांसाठी सर्वसामान्य नागरिक लोकल रेल्वेचा उपयोग करू शकतील.

प्रश्न : खासगी वाहने कर्मचाऱ्यांना घेऊन कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी ये-जा करू शकतील?

उत्तर - ज्यांची कार्यालये किंवा आस्थापने आवश्यक गटात असतील किंवा त्यांना निर्बंधातून वगळले असेल तेच प्रवास करू शकतील

प्रश्न : बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेचे काय?

उत्तर - आवश्यक सेवा असल्याने त्या सुरूच राहतील आणि त्यातून कुणीही प्रवास करू शकेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.