मुंबई Naresh Goyal : नरेश गोयल यांच्या वकिलांनी त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा न्यायालयात केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या विविध दाखल्यांचा आधार देत उच्च न्यायालयानं त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. तसंच अशा प्रकारची याचिका दाखल (Naresh Goyals Petition) करता येत नसल्याचं देखील न्यायालयानं नमूद केलं. नरेश गोयल यांच्यासाठी ज्येष्ठ वकील अमित देसाई, आबाद पोंडा, अमित नायक यांनी युक्तिवाद केला होता. ईडीचे वकील हितेन वेणूगावकर यांचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला.
बँकेला 538 कोटींचा लावला चुना : या प्रकरणात, कफ परेड येथील कॅनरा बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयाकडून कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तक्रारीनुसार, हा गुन्हा 1 एप्रिल 2009 ते 5 जून 2019 दरम्यान घडला होता. जेट एअरवेजचं खातं 5 जून 2019 रोजी बँकेनं दिवाळखोर म्हणून घोषित केलं होतं. त्यानुसार बँकेला 538 कोटी 62 लाख रुपयाचं नुकसान झालंय. या प्रकरणी नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयलसह चार कंपन्यांविरोधात ईडीनं मुंबई पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय.
गोयल कुटुंबाच्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी : ईडीच्या तपासानुसार नरेश गोयल यांनी सुमारे 6000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवलंय. फॉरेन्सिक अकाउंटंट परीक्षेतील कन्सल्टन्सी तसंच प्रोफेशनल फीच्या नावावर सुमारे 1 हजार 152 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. तसंच गोयल यांनी सुमारे 40 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. जेट एअरवेजचं कर्ज फेडण्यासाठी 2,547 कोटी 83 लाखांचा वापर करण्यात आला. गेल्या काही वर्षांत नरेश गोयल यांच्या कुटुंबीयांना 9 कोटी 46 लाख रुपये देण्यात आले. त्यात गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल, मुलगी नम्रता गोयल, मुलगा निवान गोयल यांचा समावेश आहे. 2011-12 ते 2018-19 या कालावधीत कंपनीकडून विविध कारणे देत ही रक्कम पाठवण्यात आली आहे. त्यामुळं ईडी काही परदेशी कंपन्यांची, तसंच गोयल कुटुंबाच्या मालमत्तेची चौकशी करत आहे.
हेही वाचा -