ETV Bharat / state

Bombay High Court : माझगाव डॉक परिसर अतिशय संवेदनशील परिसर ; उंच इमारतींना परवानगी नाही - उच्च न्यायालयाने फेटाळला व्यवसायिकाचा अर्ज - माझगाव डॉक संरक्षित क्षेत्र

2018 मध्ये माझगाव डॉक परिसरात एका इमारतीच्या कामाला मुंबई महापालिकेने काम बंद नोटीस बजावली (application on Tall building in Mazgaon dock area ) होती. याचप्रकरणी विकासकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. माझगाव डॉक संरक्षित क्षेत्र असल्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या हेतूने या परिसरात उंच इमारतीला परवानगी देता येणार (Bombay High Court rejected businessman application) नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Dec 12, 2022, 1:22 PM IST

मुंबई : मुंबईमधील अतिशय संवेदनशील असलेल्या परिसर म्हणून माझगाव डॉक प्रसिद्ध आहे. या ठिकाणी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अनेक महत्त्वाची कार्यालय या परिसरामध्ये आहे. या जवळील उंच इमारतीचा वापर हेरगिरीसाठी होऊ शकतो, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान नोंदवले आहे. या परिसरामध्ये 29 मजली इमारत बांधण्याची परवानगी व्यवसायिकाकडून मागण्यात आली होती. ही उच्च न्यायालयाने (Bombay High Court ) फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी पार पडली आहे.

काम बंद नोटीस बजावली : माझगाव डॉक परिसरात उंच इमारतींना परवानगी देता येणार नाही असे, मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांच्या वैयक्तिक हक्कापेक्षा देशाची सुरक्षा अधिक महत्त्वाची असल्याचे मतही न्यायालयाने यावेळी नोंदवले आहे. दरम्यान 4 मजले उभारण्याची परवानगी असलेल्या परिसरात सुरु कामाला मुंबई महापालिकेने 2018 मध्ये काम बंद नोटीस बजावली होती. याचप्रकरणी विकासकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली (application on Tall building in Mazgaon dock area ) होती.

इमारतीला परवानगी नाकारली : माझगाव डॉक संरक्षित क्षेत्र असल्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या हेतूने या परिसरात उंच इमारतीला परवानगी देता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी स्पष्ट केले. दक्षिण मुंबईतील एका उंच इमारतीस पालिकेने नाकारलेली परवानगी योग्यच असल्याचेही मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या वैयक्तिक हक्कापेक्षा देशाची सुरक्षा अधिक महत्त्वाची असल्याचे मत नोंदवत न्यायालयाने माझगाव डॉक परिसरातील 29 मजली इमारतीला परवानगी नाकारली (Bombay High Court rejected businessman application) आहे.

काय आहे प्रकरण : मुंबई महापालिकेकडून माझगाव डॉक परिसरात इमारतीच्या बांधकामाला एका विकासकाला परवानगी देण्यात आली होती. विकासकाने बांधकाम सुरु केले. मात्र सात मजले बांधल्यानंतर महापालिकेने 2018 मध्ये काम थांबवण्याची नोटीस बजावली तरीही विकसकाने 29 मजल्यापर्यंत बांधकाम केले. केंद्र सरकारच्या गोपनीयता कायद्यानुसार महापालिकेने परवानगी नाकारल्याने रहिवासी आणि विकसकानं उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी पार (High Court rejected Tall building in Mazgaon) पडली.

सुरक्षा अत्यंत महत्त्वाची : माझगाव डॉक परिसर अधिकृतपणे अतिशय संवेदनशील परिसर असून येथील सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. माझगाव डॉक्सजवळील उंच इमारतीचा वापर हेरगिरीसाठी होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारे या भागांत गुप्तहेरगिरी किंवा गोपनीय माहिती उघड होता कामा नये. या परिसरातील उंच इमारतीमधून गुप्तहेरगिरी, छायाचित्रे किंवा तत्सम प्रकार होणार नाही, याची हमी देता येणार नाही. नागरिकांच्या वैयक्तिक हक्कापेक्षा देशाची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे देशाच्या एकात्मिकता आणि सुरक्षेच्या हेतूने येथे उंच इमारतीला परवानगी देता येणार नसल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले (Tall building in Mazgaon dock area) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.