ETV Bharat / state

रस्ते अपघातातील आरोपी महिलेचा पुरुष कसा झाला? उच्च न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे - Bombay High Court Notice

Bombay High Court News : एका अपघाताप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सह पोलीस आयुक्त ठाणे आणि सह पोलीस आयुक्त कल्याण यांना नोटीस बजावली आहे. ज्यात न्यायालयाचा अवमान करण्यासह कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.

Bombay High Court Notice to Joint Commissioner of Police
एका अपघाताप्रकरणी उच्च न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 10:03 AM IST

Updated : Nov 20, 2023, 1:15 PM IST

मुंबई Bombay High Court News : जानेवारी 2023 मध्ये कल्याण परिसरात एक अपघात झाला होता. त्याबाबत पीडित पुरुषाकडून आरोपी म्हणून एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी महिलेचं दाखल केलेलं नाव बदललं आणि त्याजागी पुरुषाचं नाव दाखल केलं. दरम्यान, या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं पोलिसांना विचारणा केली की, अगोदर आरोपी महिला होती मग पुरुष कसा झाला? याचं उत्तर द्या. तसंच न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का करू नये, असं म्हणत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चंडक यांनी पोलिसांना फटकारले.

एफआयआरमध्ये महिलेचं नाव : 2 जानेवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास कल्याण येथील वली पीर रोडवर एका कारनं कल्याणचे रहिवासी अविनाश लांडगे यांना धडक दिली होती. या घटनेनंतर अविनाश लांडगे यांचा हात फ्रॅक्चर झाला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली. त्यामध्ये नमूद केलं की 'कारमधून एक महिला चालकाने अपघातानंतर खाली उतरून अविनाश लांडगे यांना तुला दिसत नाही का? असं विचारलं अन् ती गाडीत बसून निघून गेली.' त्यावेळी एफआयआरमध्ये महिलेचे नाव नमूद करण्यात आले. परंतु नंतर न्यायालयासमोर खटला आला तेव्हा पुरुषाचं नाव समोर आलं. त्यामुळं न्यायालयानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत त्यांना नोटीस बजावली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमधून काय दिसले : पोलिसांनी या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासले. पुण्याचे रहिवासी निखिल शिंदे यांची कार घटना घडलेल्या ठिकाणाहून रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी जात असल्याचं स्पष्ट झालं, अशी बाजू पोलिसांच्या वतीनं वकिलांनी न्यायालयासमोर मांडली होती. तर याला उत्तर देत निखिल शिंदे यांचे वकील आय. के. त्रिपाठी आणि अतुल रेडकर म्हणाले की, एफआयआर अज्ञात महिला ड्रायव्हर आणि स्विफ्ट डिझायरविरुद्ध आहे. तसंच गाडीचा क्रमांकदेखील वेगळा आहे.

न्यायालयाने बजावली नोटीस : दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं म्हंटलंय की, 19 ऑक्टोबरच्या आदेशात सह पोलीस आयुक्त कल्याण आणि सह पोलीस आयुक्त ठाणे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, एफआयआर तसंच पोलिसांचा अहवाल पडताळून पाहिला असता, अगोदर आरोपी म्हणून महिलेचं नाव होतं, त्यानंतर तिचा पुरुष कसा झाला? असा सवाल न्यायालयानं केला. तसंच पोलिसांवर कारवाई का करू नये?, अशी विचारणा करणारी नोटीस न्यायालयानं सह पोलीस आयुक्त कल्याण आणि सह पोलीस आयुक्त ठाणे यांना बजावली आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai High Court : तब्बल 18 वर्षानंतर जवानाच्या कुंटुंबाला न्याय, वृद्ध आई-वडिलांना नुकसान भरपाई
  2. Bombay High Court: १९९३ मधील अटकेच्या आदेशात आरोपीला घेतलं ताब्यात; पुरावं नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं केली मुक्तता
  3. Bombay High Court News : पुण्यातील मालमत्ता हडपडणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला उच्च न्यायालयाचा दम; हजर राहण्याचे दिले निर्देश

Last Updated : Nov 20, 2023, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.