मुंबई - महाराष्ट्र भूषण कार्यक्रम प्रकरणी याचिकेवर (Maharashtra Bhushan Award Ceremony) आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश नितीन जामदार आणि आरिफ एस डॉक्टर यांनी कोणताही निर्देश देण्यास नकार दिला आहे.
पुरस्कार सोहळा आणि वाद - महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला. त्या पुरस्काराच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार याशिवाय अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात 14 लोखांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले होते.
याचिका दाखल होती - या कार्यक्रमावेळी 14 लोकांचा उष्मघातामुळे मृत्यू झाला होता. शासनाच्या दुर्लक्षामुळे या लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
याचिका काढली निकाली - मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश नितीन जामदार व आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणी एफआयआर का दाखल केला नाही? तसेच शासनाने तपास केला आहे किंवा नाही अशी विचारणा न्यायालयाने केली असता शासनाने तपास चालू असल्याचे सांगितले. याबाबत तपास सुरू असल्यामुळे ही याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे.
काय आहे प्रकरण - नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासनाने आयोजित केला होता. यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्काराच्या सोहळ्याच्या निमित्ताने वीस लाख लोक एकत्र येतील 'अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या तीन दिवस आधी केली होती. कार्यक्रमाच्या दिवशी लाखो लोक खारघर येथील या पुरस्कार कार्यक्रमाला जमले होते. यात चेंगराचेंगरी तसेच उष्माघात या कारणांमुळे 14 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. वकील दीपक जगदेव यांनी ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.