मुंबई - शंभर कोटी कथित खंडणी ( Anil Deshmukh Extortion Case ) वसुलीच्या प्रकरणात महत्वाचा असलेला नंबर वन व्यक्ती नक्की कोण? असा प्रश्न माजी गृहमंत्री देशमुख ( Ex Home Minister Anil Deshmukh ) यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने निकालपत्रात उपस्थित केला आहे. माफीचा साक्षीदार बनलेला बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या ( API Sachin Vaze ) जबाबाबाबत प्रथमदर्शनी विश्वासार्हतेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
न्यायालायाचे 16 पानी निकालपत्र भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी जवळपास दीड वर्षभरापासून अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सोमवारी अखेर जामीन ( High Court Grant Bail To Anil Deshmukh In Extortion Case ) मंजूर केला होता. जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असला तरीही या निर्णयाला सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) आव्हान देता यावे म्हणून न्यायालयाने स्वतःच्या आदेशाला दहा दिवसांची स्थगिती दिली आहे. त्यानंतर रात्री उशिराने न्यायालायाकडून 16 पानी निकालपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या ( Bombay High Court ) वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे.
वसुलीत नंबर वन व्यक्ती नक्की कोण? आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या जाचक अटीनंतरही देशमुखांना जामीन मंजूर ( High Court Grant Bail To Anil Deshmukh In Extortion Case ) झाला. त्या प्रकरणात जामीन मंजूर करताना नोंदवलेल्या निरीक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच या प्रकरणात सीबीआय बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या जबाबावर अवलंबून आहे. खंडणी वसुलीच्या प्रकरणात ( Anil Deshmukh Extortion Case ) ( महत्वाचा नंबर वन व्यक्ती नक्की कोण? याबाबत माजी देशमुख यांच्या जामीन निकालपत्रात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. माफीचा साक्षीदार आरोपी सचिन वाझेने पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्याजवळ नंबर एकचा उल्लेख पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाचा केला होता. तर सीबीआयने न्यायालयात दाखल केलेल्या जबाबात देशमुखांचा उल्लेख आहे. त्यामुळे वाझेने नक्की कोणाला पैसे दिले, असा प्रश्न प्रथमदर्शनी उपस्थित होतो. त्यामुळे वाझेच्या जबाबाबाबत प्रथमदर्शनी विश्वासार्हता नाही, असे जामीन मंजूर करताना न्यायालयाने नमूद केले आहे.
देशमुखांना ग्रासले विविध आजारांनी देशमुख यांच्या आरोग्याची स्थितीही लक्षात घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. अनिल देशमुखांना ( Anil Deshmukh Extortion Case ) विविध आजारांनी ग्रासले होते त्यांना तातडीने उपचाराची गरज असल्याचे वैद्यकीय अहवालात दिसून येते, तसेच एप्रिलमध्ये त्यांना सीबीआय कोठडीत ठोठावण्यात आली, मात्र एक आरोपपत्र दाखल केले असून अद्याप दोन आरोपात तपासकार्य सुरू आहे. त्यामुळे खटला सुरू व्हायला विलंब लागेल असेही न्यायालयाने जामीन मंजूर करताना नमूद केले आहे.
काय आहे प्रकरण ? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Mumbai Police Commissioner Param Bir Singh ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Ex Chief Minister Uddhav Thackeray ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी ( Anil Deshmukh Extortion Case ) सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग ( Mumbai Police Commissioner Param Bir Singh ) यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहमध्ये ( Taloja Jail Thane ) न्यायालयीन कोठडीत आहे.