मुंबई : नालासोपारा येथील आचोळे रोडवरील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत साडे पाच वाजण्याच्या सुमारास एका विद्यार्थ्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा शाळेत फोन आल्याने, शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एकच खळबळ माजली आहे. शाळेने आचोळे पोलिसांना माहिती दिल्यावर वरिष्ठ अधिकारी, आचोळे पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी हजर होऊन तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉंब स्कॉडला याबाबत माहिती देण्यात आली आहे. हा कॉल कोठून व कोणी केला तसेच ही अफवा आहे का? याच दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी शाळा रिकामी केली असून शाळेची तपासणी करण्यात येत आहे.
विद्यार्थ्याच्या बॅगेत बॉंब : आचोळे रोडवरील ब्लोमिंग बर्ड नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत सोमवारी संध्याकाळी शाळेत एक निनावी कॉल आला की, एका विद्यार्थ्याच्या बॅगेत बॉंब आहे. या कॉलनंतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थी भयभीत झाले आहेत. शाळेने या कॉलबाबत आचोळे पोलिसांना माहिती दिली आहे. आचोळे पोलीस घटनास्थळी पोहचून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
बॉम्बशोधक पथकाला पाचारण : शाळेच्या व आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथे ब्लूंमीग बग नावाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. सोमवारी दुपारी शाळेत एक निनावी दूरध्वनी आला. शाळेतील एका विद्यार्थ्याच्या दप्तरात बॉम्ब ठेवला असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचार्यांना बाहेर काढून शाळा रिकामी करण्यात आली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आम्ही या तपासणी करत आहोत आहोत. सर्व मुले सुरक्षित आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी केले आहे.
हेही वाचा -