मुंबई - दिवाळीत मुंबईतील तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून (Bomb attack threat at three places in Mumbai city) आणणार असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलीस नियंत्रण कक्षास कंट्रोलवर आला होता. हा फोन काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. इन्फिनिटी मॉल, जुहू पीव्हीआर आणि सहारा हॉटेल या तीन ठिकाणी बॉम्बहल्ल्याची धमकी देण्यात आली होती.Mumbai City Bomb Attack threat
अंधेरीतील इन्फिनीटी मॉल, जुहूतील पीव्हीआर आणि सहारा हॉटेल या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून हल्ला करण्याची धमकी या फोनवरुन देण्यात आली होती. यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे जोरदार फिरवली आहेत. हे तीनही ठिकाणं मुंबईतील पश्चिम उपनगरातील वर्दीळीची ठिकाणं आहेत. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणांची कसून तपासणी केली. हा कॉल कुठून आला होता याची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी या तीनही ठिकाणची कसून तपासणी केली. या ठिकाणी संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही. या प्रकरणाचा बीडीडीएस टीम, सीआयएफ टीमने कसून तपास केला गेला. हा कॉल हॉक्स कॉल डिक्लेर करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी आलेल्या या धमकीच्या कॉलमुळे खळबळ उडाली आहे. Mumbai City Bomb Attack