ETV Bharat / state

Mumbai Crime News: मेकअप आर्टिस्ट सारा यंथनचा पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला, हत्या की आत्महत्या?

सारा यंथन या चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्टच्या संशयास्पद मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उाडली आहे. या प्रकरणात खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Sarah Yanthan Suspicious death
मेकअप आर्टिस्ट सारा यंथन
author img

By

Published : Jun 21, 2023, 9:40 AM IST

मुंबई : सेलिब्रिटीच्या मृत्यूने खारखरमध्ये खळबळ उडाली आहे. सारा यंथन (वय वर्ष 26) ही चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्ट मंगळवारी रात्री खार दांडा येथील भाड्याच्या घरात राहत होती. तिच्या हातावर जखमा तसेच रक्तबंबाळ अवस्थेत पंख्याला लटकलेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे. मूळची नागालँड येथील सारा यंथन ही मुंबईत चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेब सिरीजमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती.

बँकेत काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबत साराचे संबंध होते आणि तो तिला लग्नासाठी बळजबरी करत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. रविवारी सकाळपासून सारा फोनला प्रतिसाद देत नव्हती. त्यावेळी तिच्या फ्लॅटच्या भाड्याची रक्कम थकलेली असल्याने सोमवारी एजंट भाड्यासाठी पुन्हा तिच्या घरी गेला तेव्हा त्याला संशय आला. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली सोमवारी रात्री खार पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा सारा बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळली पोलिसांना तिच्या दोन्ही हातावर कापल्याच्या खुणाही दिसल्या आहेत. याप्रकरणी खार पोलिस आणि गुन्हे शाखा तपास करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाज जसा आहे की, कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावला असावा.

न्याय देण्याची साराच्या आईची मागणी: पोलिसांनी नागालँडमध्ये राहणारी मृत साराची आई रोझी यांच्याशी संपर्क साधला. नंतर त्या मंगळवारी मुंबईत आल्या. खार पोलिसांनी मंगळवारी दुपारी कूपर रुग्णालयामध्ये सारा यंथनचे शवविच्छेदन केले आणि मृतदेह तिच्या आईकडे सोपवला. त्यावेळी रोझी म्हणाल्या की, रिझर्व बँकेत काम करणाऱ्या एका व्यक्तीसोबतच्या नात्याबद्दल तिने कल्पना दिली होती. तो माणूस लग्नासाठी जबरदस्ती करत आहे असेही तिने आईला सांगितले होते. बेडरूममध्ये सारा रक्ताच्या थारोळ्यात सापडली. तिला कोणीतरी मारून नंतर फासावर लटकवल्यासारखे दिसत आहे. मला संशय आहे की, तिची हत्या झाली आहे आणि पोलिसांनी याची चौकशी करून माझ्या मुलीला न्याय द्यावा, असे रोझी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-

  1. Amravati Crime News: विवाहितेचे लैंगिक शोषण; फेसबुकवरून दिली ३५ तुकडे करण्याची धमकी
  2. Thane Crime : विवाहितेची गळा चिरून हत्या करणाऱ्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जन्मठेपेची शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.