नांदेड : कोलंबी येथे बोगस सोयाबीन विक्रीसाठी सज्ज आहे, कोणत्याही क्षणी ट्रक येथून निघू शकतो, असा फोन तालुका कृषी अधिकारी सुनील वरपडे यांना रविवारी सकाळी आला. ही माहिती मिळताच वरपडे कृषी साहायक इम्रान शेख, पंढरीनाथ गुंडे व समुह साहायक नितीन देगावकर अदिसह कोलंबी गाठली. त्यावेळी एमपी ४८ एच २५७५ या क्रमांकाचा ट्रक उभा असलेला दिसून आला. या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये ३० किलो वजनाचे सोयाबीन असलेले ६९० पोते होते. त्या पोत्यावर गोदावरी सिडस् अँण्ड बायोटेक, प्लॉट न ९७६ गट न. ५५७ मु.पो. कोलंबी ता. नायगाव खै. असे प्रिंट करण्यात आलेले दिसली.
सोयाबीन बियाणे बोगस असल्याचे उघड : यावरुन सोयाबीनचे बियाणे कंपनी थेट कोलंबी येथेच असल्याचे स्पष्ट झाले, पण गोदावरी सिडस् अॅण्ड बायोटेक या कंपनीचे कागदपत्रे मागितली असता देण्यास व दाखवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे वरपडे यांनी गुणनियंत्रक बाबासाहेब गिरी यांना माहिती देण्यात आली. गिरी हे कोलंबी येथे दाखल झाले. तपासणी केली असता सोयाबीन बियाणे बोगस असल्याचे उघड झाले, त्यामुळे ट्रक ताब्यात घेतला व कंपनीला सिल करण्यात आले. ट्रकधील पोत्यासह कंपणीतही मोठ्या प्रमाणात साठा होता.
जागरूक नांगरिकामुळे फसला प्रयत्न : कंपनी चालकास याबाबत कागदपत्रे मागीतली असता टाळाटाळ करुन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अखेर कृषी अधिकाऱ्यांनी रितसर पंचनामा केला. रविवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान हा जप्त केलेला ट्रक नायगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे हे करत आहेत. ऐन पेरणीच्या तोंडावर बोगस बियाणे बाजारात आणण्याचा प्रयत्न काही जागरूक नागरिकांमुळे फसला आहे.
हेही वाचा :
- बोगस सोयाबीन बियाणांची विक्री करणाऱ्या 2 कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल...
- Bogus Degree Certificate Scam: उच्चशिक्षित तरुणाने यूट्यूबवर बघून सुरू केले 'बोगस विद्यापीठ'; 2700 हून जास्त डिग्रींचे वाटप
- Pune APMC Election: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेत गोंधळ; बोगस मतदान झाल्याचे सांगत उमेदवारांकडून मतदान थांबवण्याची मागणी