ETV Bharat / state

कांदिवलीतील बोगस लसीकरणाचा होणार खुलासा; सिरमकडून मिळालेली माहिती महापालिका पोलिसांना देणार

author img

By

Published : Jun 21, 2021, 7:26 PM IST

कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत झालेल्या बोगस लसीकरण झाल्याचे समोर आल्यानंतर पालिकेने सिरम इन्स्टिट्यूटला पत्र पाठवले आहे. या संदर्भात लवकरच खुलासा होणार असून या बोगस लसीकरणातील सूत्रधार लवकरच पकडले जाण्याची शक्यता आहे.

bmc will give the information to police about kandivali bogus vaccination
कांदिवलीतील बोगस लसीकरणाचा होणार खुलासा; सिरमकडून मिळालेली माहिती महापालिका पोलिसांना देणार

मुंबई - कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीमध्ये बोगस लसीकरण झाल्याचे समोर आल्यानंतर पालिकेने कोव्हीशील्ड लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटला पत्र पाठवले आहे. लसीच्या बॅचवरुन ही लस कोणाला पुरवण्यात आली याचा उलघडा आज (दि.२१ जून किंवा उद्या 22 जूनला) होणार आहे. सिरमकडून देण्यात आलेली माहिती पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यामुळे या बोगस लसीकरणातील सूत्रधार लवकरच पकडले जाण्याची शक्यता आहे.

माहिती देताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

पालिकेचे सिरमला पत्र
कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत झालेल्या बोगस लसीकरणानंतर खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेनेही सादर केलेल्या चौकशी अहवालात हे लसीकरण बेकायदेशीर व बोगस असल्याचे म्हटले आहे. मात्र, लस खरी होती की खोटी? याबाबतच्या पडताळणीसाठी लस उत्पादक सिरम इन्स्टिट्यूटला महापालिकेने पत्र पाठवले आहे. या पत्रात कांदिवली येथे लसीकरणा दरम्यान वापरण्यात आलेल्या लसीची बॅच पाठवण्यात आली आहेत. या लसी कुठे पुरवठा करण्यात आल्या होत्या याची माहिती मागवण्यात आली आहे. ही माहिती सिरम इन्स्टिट्यूटकडून आज (सोमवार) किंवा उद्या (मंगळवारी) पालिकेकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणासाठी वापरलेली लस ही कोणाला पुरवठा करण्यात आली होती? हे समोर येणार आहे. तसेच ही माहिती पोलिसांना दिली जाणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. यामुळे पुरवठा केलेल्या ठिकाणाहून कांदिवली येथे ही लस कशी पोहचली याचा शोध लावण्यास पोलिसांना मदत होणार आहे.

असे झाले बोगस लसीकरण
कांदिवली येथील हिरानंदानी सोसायटीतील नागरिकांसाठी ३० मे रोजी लसीकरण मोहिम राबवण्यात आली होती. सुमारे ३९० रहिवाशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यासाठी प्रत्येकी १,२६० रुपये याप्रमाणे एकूण ४,५६,००० रुपये या लाभार्थी रहिवाशांनी दिले. मात्र, लसीकरण करणाऱ्यांकडे लॅपटॉप आदी साधने नव्हती. तसेच लस घेतलेल्या लाभार्थ्यांना विविध रुग्णालयांच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. हा सर्व प्रकार संशयास्पद निर्माण करणारा असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पालिकेची परवानगी न घेता किंवा कोणत्याही रुग्णालयाशी करारनामा न करता बनावट लसीकरण करण्यात आल्याचे पालिकेच्या चौकशी अहवालातून समोर आले आहे. ही लस खरी होती की खोटी? याबाबतही सिरम इन्स्टिट्यूटच्या पडताळणीतून स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा - नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव - राज ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.