ETV Bharat / state

गारगाई धरण बांधण्याआधी भूकंप प्रवणाचा अभ्यास करण्याचा मनपाचा निर्णय

पालघर जिल्ह्यात सात्तत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. गारगाई तसेच इतर धरणे पालघर आणि नाशिकदरम्यान आहेत. यामुळे गारगाई धरण प्रकल्प उभारण्याआधी भूकंप प्रवणाचा अभ्यास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मुंबई महापालिका (संग्रहीत छायाचित्र)
author img

By

Published : Mar 12, 2019, 2:11 AM IST

मुंबई - सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेने नव्याने गारगाई धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे धरण भूकंप क्षेत्र ३ मध्ये येत असल्याने त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय पालिकेच्या जल विभागाने घेतला आहे. त्यासाठी पुण्यातील संस्थेकडून अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून घेतला जाईल, असा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबईतील सव्वा कोटी नागरिकांची तहान भागवण्यासाठी तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार ही सात धरणे महापालिकेने बांधली आहेत. या धरणांमधून ३ हजार ९०० दशलक्ष लिटर पाणी रोज मुंबईत आणले जाते. त्यापैकी १५० दशलक्ष लिटर पाणी ठाणे आणि भिवंडीला दिले जाते. तर उरलेले पाणी मुंबईला दिले जाते. पुढील काही वर्षात वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुंबईची तहान भागवण्यासाठी ४४० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा वाढवण्यासाठी महापालिकेने गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई जवळील पालघर जिल्ह्यात सात्तत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. गारगाई तसेच इतर धरणे पालघर आणि नाशिकदरम्यान आहेत. यामुळे गारगाई धरण प्रकल्प उभारण्याआधी भूकंप प्रवणाचा अभ्यास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या ‘तलाधार अभियांत्रिकी आणि विशेष विश्लेषण संचालनालय’ यांच्याकडून ‘ना हरकत व निपटारा प्रमाणपत्र’ मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (सीडबल्यूपीआरएस) ही नामांकित संस्था असून या संस्थेला पालिका १३ लाख ७७ हजार ३२० रुपये अदा करणार आहे.

Intro:मुंबई -
मुंबईची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेने नव्याने गारगाई धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या धरणाच्या परिसराचा भूकंप प्रवण क्षेत्रात समावेश होतो. गारगाई धरण भूकंप क्षेत्र ३ मध्ये येत असल्याने भूकंप प्रवण क्षेत्राचा अभ्यास करण्याचा निर्णय पालिकेच्या जल विभागाने घेतला आहे. त्यासाठी पुण्यातील संस्थेकडून अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून घेतला जाणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी सदर करण्यात आला आहे. Body:मुंबईतील सव्वा कोटी नागरिकांची तहान भागवण्यासाठी तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार ही सात धरणे महापालिकेने बांधली आहेत. या धरणांमधून ३ हजार ९०० दशलक्ष लिटर पाणी रोज मुंबईत आणले जाते. त्यापैकी १५० दशलक्ष लिटर पाणी ठाणे आणि भिवंडीला दिले जाते. तर उरलेले पाणी मुंबईला दिले जाते. पुढील काही वर्षात वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुंबईची तहान भागवण्यासाठी ४४० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा वाढवण्यासाठी महापालिकेने गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई जवळील पालघर जिल्ह्यात सात्तत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. धरण क्षेत्रात भूकंपाचे धक्के बसतात. गारगाई तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे पालघर आणि नाशिक दरम्यान आहेत. यामुळे गारगाई धरण प्रकल्प उभारण्याआधी भूकंप प्रवणाचा अभ्यास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या ‘तलाधार अभियांत्रिकी आणि विशेष विश्लेषण संचालनालय’ यांच्याकडून ‘ना हरकत व निपटारा प्रमाणपत्र’ मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (सीडबल्यूपीआरएस) ही नामांकित संस्था असून या संस्थेला पालिका १३ लाख ७७ हजार ३२० रुपये अदा करणार आहे.

बातमीसाठी पालिकेचा फोटो किंवा पालिकेचे vis वापरावेत..... Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.