ETV Bharat / state

Mumbai Corona Update : कोरोनाचा धोका, मुंबई महापालिका सतर्क ; कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू - कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली (BMC High alert Rise on Corona virus patients) आहे. कोरोना बाधित रुग्णांना होमक्वारंटाइन करण्यात येत (covid positive patients Mumbai) आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळून येणाऱ्या प्रवाशांना क्वारेंटाईन केले जात आहे. पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोध मोहिम महापालिकेने सुरु केली (Mumbai Corona Update) आहे.

Mumbai Corona Update
कोरोनाचा धोका
author img

By

Published : Jan 2, 2023, 9:34 AM IST

मुंबई : जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार वाढला आहे. बीएफ ७ व १२० पटीने पसरणाऱ्या एक्सबीबी १.५ व्हेरिएंटचा धोका असल्याने मुंबई महापालिका सतर्क झाली (Mumbai Corona Update) आहे. विमानतळ किंवा मुंबईत एखादा रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची (क्लोज काॅटेक्ट ट्रेनिंग) शोध मोहिम सुरु केली आहे. बाधित रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे, पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. चीनसह काही देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या बीएफ ७ चे गुजरात व ओडिसात रुग्ण आढळून आले आहेत. तसेच गुजरातमध्ये एक्सबीबी १.५ व्हेरिएंटचाही रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्यामधून पॉझिटीव्ह आढळून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन केले जात (BMC High alert Rise on Corona virus patients) आहे.

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोध : मुंबई विमानतळावर आढळलेल्या तीन कोरोना बाधित प्रवाशांच्या स्वॅब पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले असून पुढील दोन ते तीन दिवसांत अहवाल प्राप्त होणार (covid positive patients Mumbai) आहे. दरम्यान विमानतळावर आढळून आलेल्या तसेच मुंबईत रोज करण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या माध्यमातून पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोध मोहिम महापालिकेने सुरु केली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या माध्यमातून कोरोना पसरू नये, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. मंगला गोमारे यांनी (Rise on Corona virus patients) दिली.

कोरोना नियमांचे पालन करा : कोरोना व त्याच्या व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी वारंवार हात स्वच्छ धुवावे, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, तसेच गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क लावावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले (Corona virus patients) आहे.

संसर्गाची एकूण प्रकरणे : उल्लेखनीय म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर 90 लाखांवर गेली होती. 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली होती आणि 23 जून 2021 रोजी ती तीन कोटींच्या पुढे गेली होती. यावर्षी 25 जानेवारी रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.