ETV Bharat / state

Mumbai Beaches: मुंबईतील समुद्र खवळला; सहा चौपाट्यांवर तैनात राहणार १२० जीवरक्षक

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्र खवळला आहे. सतर्कता म्हणून मुंबईच्या सर्व चौपाट्या बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या हेतूने मुंबईतील सहा चौपाट्यांच्या ठिकाणी १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

Mumbai  Beaches
सहा चौपाट्यांवर तैनात राहणार १२० जीवरक्षक
author img

By

Published : Jun 15, 2023, 9:57 PM IST

मुंबई : मुंबई महानगरातील समुद्रकिनारी व चौपाट्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये फिरण्यासाठी व पोहण्यासाठी जात असतात. याबाबत मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने जनजागृती करून नागरिकांना पोहण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी समुद्रात शिरु नये असे बजावूनसुद्धा काही नागरिक समुद्रात जातात. प्रसंगी बुडण्याच्या अप्रिय घटना घडतात. अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत तसेच नागरिकांची सुरक्षितता करण्याच्या उद्देशाने मुंबईतील सहा चौपाट्यांवर १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. परंतु याचसोबत अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जीव रक्षकांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, ही मागणी सुद्धा वाढत आहे.

चौपाट्यांवर नागरिक व पर्यटकांची गर्दी : मुंबईला अरबी समुद्राचा १४५ किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा कुलाबा येथून सुरू होऊन गोराई आणि तिथून पुढे मुंबई महानगर प्रदेशात पसरलेला आहे. त्यात मुंबईत सहा चौपाट्या उपलब्ध आहेत. या चौपाट्यांवर नागरिक व पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. विशेषतः समुद्रात पोहण्यासाठी नागरिक, पर्यटकांची ओढ जास्त असते. नियम धाब्यावर बसवून ते पोहण्यासाठी समुद्रात उतरतात व कधी कधी हेच त्यांच्या जीवावर बेतते. याच कारणासाठी अशा पद्धतीच्या घटना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईतील सहा चौपाट्यांवर १२० सुरक्षा रक्षक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील जीव रक्षकांची संख्या जरी वाढणार असेली तरीसुद्धा अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या जीव रक्षकांना कायमस्वरूपी नोकरीत समावेश करून घ्यावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

मुंबईत सहा चौपाट्या : मुंबईतील दादर आणि गिरगाव या चौपाट्या मुंबई शहर विभागामध्ये येतात. तसेच वर्सोवा, आक्सा, गोराई, जुहू या चौपाट्या पश्चिम उपनगरात असून जुहू बीच सुद्धा फार धोकादायक आहे. या सर्व चौपाटीच्या ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात असतील. तसेच दुपारी ३ ते रात्री ११ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक कार्यरत राहणार असल्याची माहिती, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे. हे सुरक्षा रक्षक पूर बचावाचे प्रशिक्षण घेतलेले तसेच शहर आपत्ती प्रतिसाद पथकातील असणार आहेत.

मागच्याच आठवड्यात मुंबईत ४ बळी : मागच्याच आठवड्यात मुंबईतील वर्सोवा, सांताक्रुझ (पूर्व) येथील ८ तरुण अशाचप्रकारे नियमभंग करून समुद्रात शिरले. समुद्रात शिरल्यावर लाटांचा अंदाज न आल्याने दुर्दैवाने ते समुद्राच्या लाटेत ओढले गेले, त्यापैकी चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणांना समुद्रात उतरण्यापासून जीवरक्षकांनी मज्जाव केला होता. तरी सुद्धा त्यांचे लक्ष चुकवून हे तरुण समुद्राच्या पाण्यात उतरले. त्यांना आपला जीव गमवावा लागला. अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी आता सहाही समुद्र चौपाट्यांवर १२० सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. नागरिक तसेच पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, यासाठी हे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक प्रयत्न तर करतीलच सोबत पाण्यात बुडण्याच्या घटनांपासून नागरिकांचा जीव सुद्धा वाचणार आहेत.

गुजरात किनाऱ्याला धडकले चक्रीवादळ : दरम्यान गुजरात येथून आलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकले आहे. ताशी १३० किमीच्या वेगाने वारे वाहात आहेत. तसेच पाऊसही सुरु झाला आहे. कच्छमध्ये नुकसानीचा आकडा प्रथम आला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावापूर्वी कच्छमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. ७ गुरे मरण पावली आहेत तर भुजमध्ये विजेचा धक्का लागून दोघांचा तर झाड पडून एकाचा मृत्यू झाला आहे. गांधी धाममध्ये वीज पडून दोन गुरांचा मृत्यू झाला आहे. तर कच्छच्या किनारी भागात 118 झाडे उन्मळून पडली, तसेच कच्छमधील भुज, नख्तरणा, अब्दासा परिसरात एकूण 157 विजेचे खांब कोसळले.

हेही वाचा -

  1. cyclone biparjoy Landfall update जखाऊमध्ये लँडफॉल करणार बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईतील या सहा चौपाट्यांवर मोठा बंदोबस्त
  2. Cyclone Biperjoy मुंबईच्या समुद्रातून उसळू लागल्या उंच लाटा सर्व चौपाट्यांवर सुरक्षा रक्षक तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.