ETV Bharat / state

Doctors Strike डॉक्टरांच्या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही, मुंबई महापालिका प्रशासनाची माहिती - डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसोबत बैठक

आपल्या विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप ( Doctors Strike In Maharashtra ) पुकारला होता. त्यामुळे राज्यातील रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने डॉक्टरांच्या संपाचा ( Not Affected Health Service Due To Doctors Strike ) कोणताही परिणाम आरोग्य सेवेवर झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. महापालिकेच्या ( Municipal Corporation Administration ) वतीने आज करण्यात आलेल्या विविध शस्त्रक्रियेची माहितीच देण्यात आली आहे.

Doctors Strike In Maharashtra
निवासी डॉक्टरांचा संप
author img

By

Published : Jan 3, 2023, 8:40 PM IST

मुंबई - आपल्या विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संप ( Doctors Strike In Maharashtra ) पुकारला केला आहे. या संपात महापालिकेचे २ हजार निवासी डॉक्टर सहभागी झाले असून त्यामुळे ओपीडी सेवा बंद असल्याचे म्हटले आहे. मात्र महापालिका प्रशासनाने संपाचा ( Not Affected Health Service Due To Doctors Strike ) कोणताही मोठा परिणाम झाला नसल्याचे दावा ( Mumbai Municipal Corporation Administration ) केला आहे. दरम्यान वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन ( Minister Girish Mahajan ) यांनी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

Doctors Strike In Maharashtra
निवासी डॉक्टरांचा संप

मोठा परिणाम नाही, महापालिकेचा दावा आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील ७ हजार निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्यात महापालिकेच्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयातील २ हजार निवासी डॉक्टर सहभागी झाले होते. या संपाबाबत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नसल्याने हा संप करण्यात आला. आज दुसऱ्या दिवशीही निवासी डॉक्टर नसल्याने पालिकेच्या रुग्णालयात ओपीडी सेवेवर ( OPD Closed Due To Doctors Strike ) परिणाम झाला. मात्र पालिका प्रशासनाने असा कोणताही मोठा परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने आज रुग्णालयात ओपीडी सेवा आणि ऑपरेशन याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

केईएम रुग्णालय परेल येथील केईएम रुग्णालयात ( KEM Hospital ) २९० रुग्ण इमरजन्सी विभागात दाखल झाले. आज १०९ रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. नवीन ओपीडीत १६९८, जुनी ओपीडीत २१७७ रुग्णांनी उपचार केले गेले. ९ प्रसूती झाल्या. ६ मृत्यू झाले असून ५ पोस्टमार्टम करण्यात आले. ६५ मोठी तर ७६ छोटी ऑपरेशन करण्यात आली.

सायन रुग्णालय सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात आज २५८ रुग्ण इमरजन्सी विभागात दाखल झाले. ९३ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. नवीन ओपीडीत ८, जुनी ओपीडीत ३८१ रुग्णांनी उपचार केले गेले. १ प्रसूती झाली. ९ मृत्यू झाले असून १ पोस्टमार्टम करण्यात आले. २० मोठी तर ७ छोटी ऑपरेशन करण्यात आली.

नायर रुग्णालय मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात आज १४९ रुग्ण इमरजन्सी विभागात दाखल झाले. ५९ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. नवीन ओपीडीत १०९७, जुनी ओपीडीत १२९४ रुग्णांनी उपचार केले गेले. ४ प्रसूती झाल्या. ३ मृत्यू झाले असून एकही पोस्टमार्टम करण्यात आलेले नाही. २० मोठी तर ३ छोटी ऑपरेशन करण्यात आली.

कूपर रुग्णालय विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात आज ३४ रुग्ण इमरजन्सी विभागात दाखल झाले. १२ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. नवीन ओपीडीत ६४२, जुनी ओपीडीत ८६९ रुग्णांनी उपचार केले गेले. १ प्रसूती झाली. एकही मृत्यू झालेला नाही तसेच एकही पोस्टमार्टम झालेले नाही. १५ मोठी तर ४ ऑपरेशन करण्यात आली.

पहिल्या दिवशीची रुग्णसंख्या 211 रुग्ण इमरजन्सी विभागात दाखल झाले. 231 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. नवीन ओपीडीत 4163, जुनी ओपीडीत 4357 रुग्णांनी उपचार केले गेले. 9 प्रसूती झाल्या. 19 मृत्यू झाले, 6 पोस्टमार्टम करण्यात आले. 71 मोठी ऑपरेशन तर 32 छोटी ऑपरेशन करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.