ETV Bharat / state

राष्ट्रपती राजवटीचा पहिला फटका आदित्य ठाकरेंना, मातोश्रीबाहेरील 'आपला आमदार आपला मुख्यमंत्री' होर्डिंग्ज हटवले

महापालिकेने मातोश्री बाहेरील शिवसेनेच्या होर्डिंग्जवर कारवाई केली आहे. यावर 'आपला आमदार आपला मुख्यमंत्री' असे लिहिले होते. आता हा फलक पालिकेने काढून टाकाला आहे. राष्ट्रपती राजवटी लागू झाल्यानंतर ही कारवाई केल्याचे दिसत आहे.

मातोश्री बाहेरील होर्डिंग्जवर पालिकेची कारवाई
author img

By

Published : Nov 13, 2019, 12:36 PM IST

मुंबई - महापालिकेने मातोश्री बाहेरील शिवसेनेच्या होर्डिंग्जवर कारवाई केली आहे. यावर 'आपला आमदार आपला मुख्यमंत्री' असे लिहिले होते. आता हा फलक पालिकेने काढून टाकला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर ही कारवाई केल्याचे दिसत आहे.

मातोश्री बाहेरील होर्डिंग्जवर पालिकेची कारवाई

हेही वाचा - शिवसेना आणि महाआघाडीतला 'किमान समान कार्यक्रम' जाणून घ्या...

महापालिकेच्या कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबत कारण विचारले असता त्यांनी उत्तर द्यायला मात्र टाळाटाळ केली आहे.

राष्ट्रपती राजवट -

भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनादेखील सत्ता स्थापन करू शकली नाही. मात्र, त्यांनी राज्यपालांना वेळ वाढवून मागितला होता. त्यांनी तो वेळ नाकारला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला विचारणा केली. मात्र, राष्ट्रवादीने देखील अवधी मागितला होता. राज्यपालांनी त्यांना देखील वेळ वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

हेही वाचा - आरटीआयच्या चौकटीत सरन्यायाधीशांचे कार्यालय येणार? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय

Intro:मुंबई - मातोश्री चार दरवाजा बाहेरील शिवसेनेची होर्डिंग्ज मुंबई महानगरपालिकेने कारवाई करत काढायला सुरुवात केली.
Body:या होर्डिंगवर आपला आमदार आपला मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असं लिहिलं होतं. होर्डिंग्ज महापालिकेने कारवाई करत काढली आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मातोश्री बाहेरच्या होर्डींग कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई बाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र उत्तर देण्यास टाळलं आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.