ETV Bharat / state

दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपा आणि मित्र पक्षांचे राज्यव्यापी आंदोलन - राज्यभरातील दूध दरवाढीचे आंदोलने

दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपा आणि मित्रपक्षांनी सरकार विरोधात आंदोलन केले. या आंदोलनाचा जिल्हानिहाय आढावा पुढील प्रमाणे.

दूध दरवाढ आंदोलन
दूध दरवाढ आंदोलन
author img

By

Published : Aug 1, 2020, 10:41 PM IST

मुंबई - भाजपा आणि मित्र पक्षांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार आज राज्यात विविध ठिकाणी महाविकासआघाडी विरोधात जोरदार आंदोलने करण्यात आली. दरम्यान, गायीच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान, यासह शेतकऱ्यांच्या दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३० रुपये करावा यासह अनेक मागण्या करण्यात आल्या. राज्यभरात झालेल्या आंदोलनाचा संक्षिप्त आढावा पुढील प्रमाणे.

अहमदनगर - जिल्ह्यात विविध ठिकाणी दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शिर्डी जवळील राहाता येथे नगर मनमाड महामार्गावर करण्यात आलेल्या आंदोलनात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही सहभागी झाले होते. सरकार मधील मंत्र्यांचेच दूध संघ असल्याने ते अडचणीत येवू नये म्हणूनच दुधाचे दर न वाढविण्याच षडयंत्र या सरकारने केल आहे. तसेच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच रुपयाच्या आनुदानातही मोठा घोटाळा झाल्याच खळबळ जनक आरोपही विखेंनी यावेळी केला आहे.

शेवगाव (अहमदनगर) - जिल्ह्यातील शेवगाव भाजपाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकारचा निषेध करण्यात आला. शेवगावमधील गोपीनाथराव मुंडे चौकामध्ये भाजपाचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी या वेळी सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली, यावेळी दूध रोडवर ओतण्यात आले, तसेच या वेळी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे कार्यकर्त्यांकडून दहन करण्यात आले.

जळगाव - दूध दरवाढीप्रश्नी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कानळदा रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विधानपरिषद आमदार चंदूलाल पटेल, महापौर भारती सोनवणे, मनपा स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भुसावळ (जळगाव) - महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जामनेरात माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवून सत्तेत आलेले महाविकास आघाडीचे सरकार हे ढोंगी आणि खोटारडे सरकार असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

तर राज्य सरकारने दूध भुकटी निर्यातीवरील बंदी उठावावी, नाहीतर दुधाला १० रुपये वाढीव भाव द्यावा, अशी मागणी करत महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरी व दूध उत्पादकांच्या भावानाशी खेळणारे सरकार असल्याचा घणाघात चाळीसगाव येथील आंदोलनात खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.

नागपूर - जिह्यातील कामठी येथे भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी गायीच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान देण्यात यावे, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळाले पाहिजे यासह शेतकऱ्याच्या दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३० रुपये करावा, या मागण्या करण्यात आल्या. भाजप नेते बावनकुळे यांनी यावेळी नागरिकांना मोफत दूध वाटप करत सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात नारेबाजी करत राज्य सरकार ने तत्काळ मागणी मान्य करावी अशी मागणी केली.

लातूर - कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्यसरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी न राहता त्यांच्या अडचणीत भर पाडत आहे. शेती पूरक व्यवसाय असणाऱ्या दुधाला दिवसेंदिवस कमी दर दिला जात आहे. दुधाला योग्य दर मिळावा तसेच प्रतीलिटर 10 रुपयांचे अनुदान मिळावे या करीता रेणापूर फटा येथे रस्तारोको करण्यात आला. गेल्या सहा महिन्यात महायुतीच्या काळात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आमदार रमेश कराड यांनी केला आहे.

निलंगा (लातूर) - भाजप महायुतीच्या वतीने आमदार संभाजीराव‌ पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली उदगीर निलंगा रोडवर दिनांक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर निलंगा येथील उपविभागीय अधिकारी विकास माने यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

औरंगाबाद - शहरात आणि जिल्ह्यातील विविध भागात वेगवेगळ्या ठिकाणी दूध दरवाढीसाठी आंदोलने करण्यात आली. रास्तारोको करण्यास परवानगी नाकारल्यात आल्याने सरकार विरोधी घोषणाबाजी करत भाजपला आंदोलन करावे लागले. औरंगाबाद शहर भाजप तर्फे दूध डेअरी चौकात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या फोटोला दुधाने अभिषेक घालत भाजपने सरकारविरोधी आंदोलन केले. आंदोलकांना अडवताना झालेल्या झटापटीत शरद पवारांच्या फोटोची मोडतोड झाली. यानंतर लगेच पोलिसांनी तातडीने फोटो ताब्यात घेतला.

बारामती (पुणे) - मागील काही दिवसांपासून राज्यात दूध आंदोलन पेटले आहे. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दुधाला ५ ते १० रुपये दर वाढवून मिळावा, खाजगी दूध डेअरीत १९ रुपयांपर्यंत दुधाचे दर खाली उतरले आहेत. त्यामुळे दूध दर वाढ होणे आवश्यक आहे, या मागणीसाठी भाजपा, रासपच्या वतीने बारामती येथील पेन्सिल चौक व तालुक्यातील काटेवाडी येथे दूध ओतून सरकारविरोधी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सरकारने लवकरात लवकर दुधाला योग्य भाव वाढवून द्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल. असा इशारा यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष व भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

आंबेगाव (पुणे) - भाजप सरकार मागील पाच वर्षांपासून सत्तेत होते. मात्र, दूध उत्पादक शेतकरी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत भाजप सरकारने कुठल्याच उपाययोजना केल्या नसून आज भाजपने दूध दरवाढीविरोधात आंदोलन पुकारले आहे. हे भाजपाचे आंदोलन 'राजकीय आंदोलन' असल्याचा टोला उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लगावला आहे.

देशात व राज्यात कोरोना महामारीचे संकट आहे. या संकटातही राज्यसरकारने अतिरिक्त दूध खरेदीचा निर्णय घेतला. यातून शेतकऱ्यांच्या दुधाचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या व शेतकऱ्यांना यातून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढील काळात दुधाचे दर व निर्यातीबाबत राज्य सरकारच्या मंत्रीमंडळात विचार विनिमय सुरू असून पुढील काळामध्ये यावरही योग्य तो निर्णय राज्य सरकार घेईल असा विश्वास उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला. ते मंचर येथील कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते.

दौंड (पुणे) - सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचे संकट गडद झाल्यामुळे सर्वच व्यवसाय अडचणीत सापडले असून राज्यातील दुध उत्पादक ही सद्या आर्थिक संकटात संपले आहेत. मात्र सरकारने दुध उत्पादकावर अन्याय केला असून दुधाला बाजारभाव देण्यात सरकार पुर्णपणे अपयशी ठरले असल्याचे मत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला.

जालना - जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिराच्या परिसरात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दुधाची नासाडी न करता गोरगरिबांना दूध वाटप करून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र सचिव ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रीय समाज पक्षाने याच मागण्यांसाठी आंदोलन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. मात्र, त्याचा काहीच परिणाम न झाल्यामुळे आज पक्षाने स्वतंत्र आंदोलन केले. या आंदोलनात कैलास कोळेकर, विनोद मावकर, सिद्धेश्वर खरात, संदीप पवार, शिवाजी जोशी, संतोष कोल्हे, भगवान काळे, आदींची उपस्थिती होती.

भोकरदन (जालना) - भाजपाच्या वतीने भोकरदन तहसील कार्यालय येथे सरकारच्या विरोधात दूध आंदोलन करण्यात आले. भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वखाली दूध आंदोलन करण्यात आले.

नाशिक - जिल्ह्यात भाजपाच्या वतीने मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. यावेळी खासदार भारती पवार, आमदार प्रा.देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले यांसह पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नाशिक जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर भाजपसह महायुतीच्या मित्रपक्षांनी आंदोलनात सहभाग घेत महाविकास आघाडी विरुध्द जोरदार घोषणाबाजी करत रास्तारोको केला यावेळी महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजुनीं अडवत दुधाला हमी भाव देण्याची मागणी केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशासाठी भाजप आग्रही असून यापूर्वी सरकारला इशारा देण्यात आला होता. मात्र, दूध उत्पादकांची निराशा करण्याचे काम शासनाने केले असून अजूनही सरकारने भानावर यावं अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

दिंडोरी (नाशिक) - नाशिक भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २१ जुलैला संपूर्ण राज्यात राज्य सरकारला दूध भेट देऊन दुध व्यावसायिक शेतकर्‍यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली होती, परंतू महाविकास आघाडी सरकारने त्याबाबतीत कोणताही निर्णय न घेतल्याने राज्य सरकार विरोधात भारतीय जनता पक्ष दिंडोरी शहर व तालुक्याच्या वतीने दूध संकलन केंद्र, नवीन कळवण रोड, दिंडोरी, मोहाडी येथे महाएल्गार आंदोलनकरण्यात आले. राज्यातील शेतकरी विविध संकटाचा सामना करित असताना, त्यांना महाराष्ट्र शासनाने आधार देण्याची गरज आहे. मात्र आघाडी सरकार निम्मे झोपलेल आहे. यामुळेच राज्य सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे दिंडोरीचे भाजप नगरसेवक तुषार वाघमारे यांनी सांगीतले.

सातारा - जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भाजप, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम व रासप, रिपाई यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फलटण चौकात दूध ओतून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सातारा - कोरोना काळातसुद्धा ग्रामीण आणि शहरी भागात दूध पुरवठा सुरळीत पुरवण्याचे काम शेतकरी करत आहे. यामुळे दुधाबाबत शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळावा ही प्रामुख्याने मागणी असल्याचे मत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व्यक्त केले. साताऱ्यात मोती चौक येथे दुधाला योग्य भाव आणि अनुदान मिळावा या मागणीसाठी निषेध फलक हातात घेउन भाजपने आंदोलन केले यावेळी राज्य सरकारचा निषेधात घोषणा देण्यात आल्या.

धुळे - जिल्ह्यात भाजपातर्फे दूध दरवाढीसंदर्भात आंदोलने करण्यात आली. संतप्त भाजप आंदोलकांनी मुंबई - आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या.

सांगोला (सोलापूर) - शहरातील वाढेगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, फसव्या घोषणा देत सत्तेत आलेले राज्यातील आघाडी सरकार हे शेतकरी विरोधी असून निष्क्रिय आघाडी सरकारला अद्याप विकासाचा सूर गवसलेला नाही. सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार नसून महाभकास आघाडी सरकार आहे. कोणतीही दिशा नसलेले, गोंधळलेले हे सरकार असून आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसह जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी केला आहे.

पालघर - दर वाढीसाठी भाजपाने शहरातील येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात भाजप व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दूधाला खरेदी दरवाढ देण्याची मागणी केली आहे. या रास्तारोको आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला.

लातूर - शहरात झालेले आंदोलन सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. आंदोलनासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले खरे मात्र, उन्हाचा चढता पारा पाहून त्यांनी झाडाचा आडोसा घेतला. त्यामुळे एकीकडे आंदोलन सुरू होते तर दुसरीकडे वाहतूक सुरळीत सुरू होती. त्यामुळे रास्तारोकोचा केवळ दिखावा करण्यात आला का हा प्रश्न उपस्थित होत आहे. दुधाचा एक टँकर जात असताना त्याची अडवणूक करण्याचे धाडसही कोणी दाखवले नाही. शिवाय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कसलाही मेळ नसल्याचे चित्र पहायला मिळाले. शिवाय पोलिसांनी कारवाई करण्याअगोदरच कार्यकर्त्यांना अटक होण्याची घाई झाली होती त्यामुळे हा निव्वळ दिखाऊपणा होता का? हा प्रश्न कायम आहे.

बदनापूर (जालना) - दुधाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांना तात्काळ मागेल तितका युरिया मिळावा या प्रमुख मागणीसह बदनापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्याना प्रति हेक्टर ५० हजार रूपये तातडीने मदत देण्यात यावी. तसेच कोरोना काळात ग्राहकांना आलेले वाढीव विज बिल माफ करण्यात यावे. शासकिय मका खरेदी केंद्र सूरू करून त्याला मुदत वाढ देण्यात यावी आदी मागण्यासाठी भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आले असून बदनापूर तहसीलदार यांना या मागण्याचे निवेदन देण्यात आले. आमदार नारायण कुचे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

भंडारा - भाजपातर्फे विधान परिषद आमदार परिणय फुके आणि खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात भंडारा शहरात त्रिमूर्ती चौकात आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनात कोरोनाच्या नियमाचा फज्जा उडविला गेला. तर भंडारा शहरात झालेल्या आंदोलनात भंडारा नगरपालिकेच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने या आंदोलनात भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भंडारा शहरात त्रिमूर्ती चौकात सुद्धा आंदोलन करण्यात आले. दुपारी बारा वाजता या आंदोलनाची वेळ ठरली होती. मात्र आंदोलन दीड वाजता सुरू झाले. महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणा सुरू झाल्या, दुधाला दर वाढवून मिळावा, कोरोनाच्या कार्यकाळात वीज बिल माफ करावे, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे या मागण्या करण्यात आल्या आणि केवळ दहा मिनिटात हे आंदोलन गुंडाळले गेले.

सोलापूर - दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे आंदोलन अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. राज्य सरकारने दूध विकत घेण्याऐवजी किंवा कंपन्यांना अनुदान देण्याऐवजी सरळ शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसह अनेक मागण्या या वेळी करण्यात आल्या.

पंढरपूर (सोलापूर) - माळशिरस तहसील कार्यालय येथे महायुतीच्या वतीने निष्क्रिय राज्य शासनाचा जाहीर निषेध करत धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील शेतकरी कोरोना संकटाच्या काळात अडचणीत आहे. त्यात दूध उत्पादक शेतकरी खूप अडचणीत आला आहे. दुधाचे दर सध्या खूपच खालावलेले असून दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर देऊन लूट करीत असल्याची आरेम आमदार राम सातपुते यांनी केला आहे.

वर्धा - गायीच्या दुधाला अत्यल्प भाव असल्याने 10 रुपये वाढवून देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यामध्ये सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेने उडी घेतली. हिंगणघाट शहरातही मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केलेल्या आंदोलनात अजब प्रकार पुढे आला. राज्यभरात गायीच्या दुधाच्या मागणीत वाढ करण्यासाठी चक्क म्हशीला आंदोलनस्थळी आणण्यात आले. या म्हशीच्या पाठीवर राज्य सरकारचा निषेध असो असे लिहण्यात आले.

वाशिम - शहरात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या मडक्यावर दूध ओतून मडके फोडून आंदोलन करण्यात आले.

कारंजा (वाशिम) - मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वाखाली शासकीय दूध संकलन केंद्र वाशिम येथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या मडक्यावर दूध ओतून मडके फोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील महिला कार्यकर्त्यांसह भाजपा कार्यकर्ते तसेच आमदार राजेंद्र पाटणी उपस्थितीत होते.

मानोरा (वाशिम) - दुधाला योग्य दर, दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, खत टंचाई दुर करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दूध आंदोलन करण्यात आले. यावेळी दगडावर दूध टाकून आंदोलन करत शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

चिखली (वाशिम) - भाजपा आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने वाशिम जिल्ह्याच्या चिखली येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सद्बुद्धी येऊदे असे साकडे घालत हनुमानाला दुग्धाभिषेक घालण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.