ETV Bharat / state

9 years of PM Modi: भाजपचे महिनाभर देशव्यापी महाजनसंपर्क अभियान, महाराष्ट्रातील नऊ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी - भाजप आमदार प्रवीण दरेकर महाजनसंपर्क मोहीम

मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने भाजपने देशभर महाजनसंपर्क मोहीम राबविण्याचे ठरवले आहे. या मोहिमेसाठी राज्यातील नऊ नेत्यांवर अभियानाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

9 years of PM Modi
भाजपचे महिनाभर देशव्यापी महाजनसंपर्क अभियान
author img

By

Published : May 25, 2023, 12:59 PM IST

मुंबई : राजस्थानमधील अजमेर येथे ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेतून महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची ही पूर्वतयारी असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे.

नऊ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी- राज्यात या महाजनसंपर्क अभियानासाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यासहित नऊ नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघात आर्थिक पाठबळातून उभे राहत असलेले प्रकल्प किंवा काम पूर्ण झालेले प्रकल्प, केंद्र सरकारच्या योजना आणि सरकारची कामगिरी हे सर्व विविध माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवले जाण्याचे प्रयत्न होणार आहेत.

सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी- अभियानातील जबाबदारी प्रत्येक मतदार संघातील आमदार, खासदार त्याचबरोबर ज्या ठिकाणी भाजपचे खासदार नसतील तिथे काही विशिष्ट नेत्यांवर ही जबाबदारी सोपविली गेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारची कामगिरी विविध माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत.

देशव्यापी जनसंपर्काचा राजकीय लाभ- नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठी हार पत्करावी लागली आहे. भाजपला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. आगामी सहा महिन्यांमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी रणनीती म्हणून देशव्यापी जनसंपर्काचा राजकीय लाभ घेण्याच्या दृष्टीने भाजपने मोहिमेची आखणी केली आहे. या मोहीमे संदर्भात सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. भाजपच्या नेत्यांना राज्यांमधील लोकप्रिय समाज माध्यम, इन्फ्लुएन्सर त्याचप्रमाणे नामांकित व्यक्तीशी संपर्क साधण्याचे लक्ष्य देण्यात आल्याचे समजते.

५० जाहीर सभा- भाजपचे हे महाजनसंपर्क अभियान ३० मे ते ३० जून असे महिनाभर राबवले जाणार आहे. यादरम्यान किमान ५० जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील काही सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सहभागी होणार आहेत. राजस्थानमधील अजमेर येथे ३१ मे रोजी मोदी यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह,केंद्रीय मंत्री, राजनाथ सिंह तसेच इतर वरिष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत.

हेही वाचा-

  1. Uddhav Thackeray News: राष्ट्रीय नेत्यांच्या मातोश्रीवर वाढल्या भेटीगाठी, उद्धव ठाकरे यांचे महत्त्व का वाढत आहे?
  2. Maharashtra Politics : आगामी निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी, ठाकरे-केजरीवाल बदलणार राजकीय समीकरण?
  3. Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; काँग्रेसने माफी मागावी, चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.