ETV Bharat / state

Raut On Fadnavis : 'भाजपचा रोजचाच शिमगा' राऊतांचा फडणवीसांवर निशाणा - 'BJP's daily Shimga'

आज सामान्य लोकांसोबतच राजकीय होळी देखील जोरात सुरू आहे. भाजप व फडणवीस यांच्या आरोपांना आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. 'भाजपचा तर रोजच शिमगा सुरू असतो' ('BJP's daily Shimga') असे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा (Raut's target on Fadnavis) साधला आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Mar 18, 2022, 1:33 PM IST

Updated : Mar 18, 2022, 3:11 PM IST

मुंबई : "भाजपचा भगवा हा नकली आणि भेसळयुक्त आहे त्यांच्या धमक्‍यांना आम्ही घाबरत नाही. त्यांनी यात लाल किंवा इतर दुसऱ्या कुठल्या रंगाचा वापर करावा. होळी वर्षातून एकदा येते पण यांचा तर रोजच शिमगा सुरू असतो यांच्या सारखा आम्ही शिमगा सुरू केला तर महाराष्ट्रात खूपच खड्डे खणलेले आहेत. तुम्हाला सुद्धा ते हळूहळू समजेल." असे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत

भाजप कडून वारंवार पूर्ण बहुमताचा सरकार देण्याचा दावा केला जातो. यावर आता राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, "त्यांना तसा विश्वास असेल तर चांगले आहे पण केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्रातल्या महा विकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणून आम्हाला घाबरवून सत्ता स्थापन करू असे भाजपला वाटत असेल तर ते चुकतात हा त्यांचा चुकीच्या आत्मविश्वास आहे."

हेही वाचा : NCP Meeting In Mumbai : नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, मात्र कार्यभार इतर मंत्र्यांकडे

Last Updated : Mar 18, 2022, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.