ETV Bharat / state

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे भंडाऱ्यात आंदोलन - सचिन वाझे प्रकरण

महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून खंडणीखोर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गृहमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

Home Minister anil deshmukh letest news, bhandara protest
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे भंडाऱ्यात आंदोलन
author img

By

Published : Mar 21, 2021, 5:34 PM IST

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. गृहमंत्री देशमुख यांच्या 100 कोटी हप्ता वसूलीच्या निषेधार्थ भंडारा शहराच्या गांधी चौकात खासदार सुनील मेंढे यांनी याचे नेतृत्व भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भ्रष्टाचारी शासन, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे भंडाऱ्यात आंदोलन..
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी -महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून खंडणीखोर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गृहमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. नैतिक जबादारी म्हणून राजीनामा द्यावा -महिनाभरापूर्वी मुंबईत मुकेश अंबानीच्या घरासमोर जिलेटिनच्या काड्या सापडल्यानंतर ज्या पद्धतीने पोलीस विभागाने हे संपूर्ण प्रकरण हाताळले आहे आणि त्यानंतरच्या सचिन वाझे नावाच्या एका अधिकाऱ्यांकडून तब्बल शंभर कोटी रुपये महिन्याला मागण्याचा प्रताप गृहमंत्री यांनी केलेला आहे. हा सर्व प्रकार पाहता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आणि मुख्यमंत्री यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी समजून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांनी केली. या आरोपानंतर हे भ्रष्टाचारी सरकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. केवळ एका अधिकार्‍याकडून शंभर कोटी जर वसूल केले जात असतील तर संपूर्ण अधिकाऱ्यांकडून किती पैसे वसूल केल्या जात असतील आणि या प्रकरणांमध्ये केवळ एक गृहमंत्री नाही तर अजूनही बरेच मंत्री असावेत, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे.पाहिले राजीनामा नंतर स्पष्टीकरण - गृहमंत्र्यांवर एवढे मोठे आरोप झाल्यानंतर ही गृहमंत्री पदाचा राजीनामा न देता ते स्वतःचे स्पष्टीकरण सोशल मीडियावर देत आहेत. पहिले त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर काय ते स्पष्टीकरण त्यांनी आपल्या नेत्यांपुढे आणि सोशल मीडिया पुढे देत राहावे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोपांची चौकशी करा आरोप सिद्ध झाल्यास गृहमंत्री आणि देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली.

हेही वाचा - 'परमबीर सिंग पत्र प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त महासंचालकांकडे द्यावी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.