मुंबई - एकीकडे महापुरुषांचा सतत केला जाणारा अपमान या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) तसेच भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांचा धिक्कार करण्यासाठी उद्या महाविकास आघाडी महामोर्चा ( Mahavikas Aghadi Mahamorcha In Mumbai ) काढणार आहे. तर दुसरीकडे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी देव देवता तसेच वारकरी संप्रदायाबद्दल केलेली आक्षेपार्ह विधाने तसेच खासदार संजय राऊत यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ( Dr Babasaheb Ambedkar ) यांच्या जन्मस्थळावरून केलेल्या वक्तव्यावर आता भाजपने हल्लाबोल सुरू केला. त्यामुळे उद्या मुंबईत त्यांच्या निषेधार्थ भाजप माफी मांगो आंदोलन ( Bjp Protest In Mumbai ) छेडणार आहे.
राऊत यांनी अफगाणी सुपारी घेतली आहे का? भाजप नेते आमदार आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी भाजपच्या माफी मांगो आंदोलनाबाबत माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले, की जाणून बुजून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Bharat Ratna Doctor Babasaheb Ambedkar ) यांच्या जन्म स्थळावरून संजय राऊत यांनी वाद उपस्थित केला आहे. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील २ पुस्तके भाजप नेते, आमदार भाई गिरकर यांनी कुरिअरने पाठवली आहेत. त्याचा त्यांनी अभ्यास करावा. देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली हे उद्धव ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) यांच्या शिवसेनेला मान्य आहे की नाही? असा सवालही शेलार यांनी केला. इतके होऊन सुद्धा माफी, दिलगिरी नाही. उद्धव ठाकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही शेलार यांनी केला. संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) सर्वज्ञानी आहेत. ते कुणालाही शिकऊ शकतील. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला, यावरून वाद निर्माण करण्यासाठी संजय राऊत यांनी अफगाणी सुपारी घेतली आहे का? असा प्रश्नही शेलार यांनी याप्रसंगी उपस्थित केला.
सुषमा अंधारेकडून देवदेवता, संत, वारकऱ्यांचा अपमान सुषमा अंधारे यांची जी वक्तव्य समाज माध्यमांमध्ये येत आहेत, त्यावरून प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, वारकरी संप्रदायातील लोकांचा अपमान त्या सातत्याने करत आहेत. हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहन कसे होत आहे? भगवान श्रीकृष्ण डेटवर जात होते, असे अंधारे म्हणतात. या सर्व कारणासाठी उद्या मुंबईभर भाजप माफी मांगो आंदोलन करणार असल्याची माहितीही शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी दिली.