ETV Bharat / state

राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांचे महत्व कमी होतेय का? भाजपचा सवाल

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरअजित पवारांनी अचानक राजीनामा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी
author img

By

Published : Sep 27, 2019, 7:57 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे. अजित पवार यांचे पक्षातील महत्व कमी होतय का? त्यामुळे पक्षात संघर्ष उफाळून आलाय का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे. विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरपर्यंत असताना अजित पवार यांनी मुदतीआधीच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

पवार यांच्या राजीनाम्या संदर्भात पक्षाचे नेते काहीही बोलण्यास तयार नाही. याबाबत थेट पक्षाध्यक्ष शरद पवारच बोलतील, अशी सारवासारव केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच पक्षातले अनेक नेते अजित पवार यांच्या कार्यशैलीला कंटाळून पक्षाला रामराम करत असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

हेही वाचा - अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा; कारण गुलदस्त्यात

दरम्यान, सत्ताधारी भाजपने मात्र राष्ट्रवादीमध्ये असलेला सत्ता संघर्ष दिसून येत असल्याचे म्हटले आहे. एकीकडे शरद पवार यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात पक्ष नेतृत्वावरूनही वाद आहेत. त्याचीच परिणती पवार यांच्या राजीनाम्यात झाली असल्याचे भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीमध्ये अजूनही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच पुढे करणारा एक गट कार्यरत आहे. दुसऱ्या फळीतल्या अजित पवार यांचे महत्व कमी करण्याचा डाव आखात असल्यानेही अजित पवार पक्षात नाराज असल्याचे चर्चीले जात आहे.

हेही वाचा - .ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय मागे

Intro:राष्टवादी मधील अंतर्गत संघर्ष ,पक्षात अजित पवारांचे महत्व कमी होतेय का ? भाजपचा सवाल

मुंबई २७

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्या नंतर उलट सुलट चर्चेला ऊत आला असून अजित पवार यांचे पक्षातील महत्व कमी होतय का ? त्यामुळॆ पक्षात संघर्ष उफाळून आलाय का असा सवाल भाजपचे प्रवक्ते मधाब भांडारी यांनी केला आहे . विधान सभेची मुदत ९ नोव्हेंबर पर्यंत असताना अजित पवार यांनी मुदती आधीच राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे .

पवार यांच्या राजीनाम्या संदर्भात पक्षाचे नेते काहीही बोलण्यास तयार नसून याबाबत थेट पक्षाध्यक्ष शरद पवारच बोलतील अशी सारवासारव केली जात आहे . लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद झाले असल्याचे सांगण्यात येत आहे . यातच पक्षातले अनेक नेते अजित पवार यांच्या कार्यशैलीला कंटाळून पक्षाला रामराम करत असल्याचे ही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे .

दरम्यान सत्ताधारी भाजपने मात्र राष्ट्रवादी मध्ये असलेला सत्ता संघर्ष दिसून येत असल्याचे म्हटले आहे . एकीकडे शरद पवार यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात पक्ष नेतृत्वा वरूनही वाद आहेत त्याचाच परिणती पवार यांच्या राजीबनाम्यात झाली असल्याचे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले आहे . राष्ट्रवादी मध्ये अजूनही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच पुढे करणारा एक गट कार्यरत असून दुसऱ्या फळीतल्या अजित पवार यांचे महत्व कमी करण्याचा डाव आखात असल्याने ही अजित पवार पक्षात नाराज असल्याचे चर्चिले जात आहे .
Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.