ETV Bharat / state

Bjp Morcha for Nawab Malik Resignation : नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी बुधवारी भाजपचा विराट मोर्चा - आशिष शेलार नवाब मलिक राजीनामा मागणी

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik Resignation Demand ) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने केली जात आहे. ( Bjp Demand Nawab Malik Resignation ) अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवसापासून या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने रान उठवलं पाहायला मिळालं.

aashish shelar
आशिष शेलार
author img

By

Published : Mar 8, 2022, 6:06 PM IST

Updated : Mar 8, 2022, 6:51 PM IST

मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik Resignation Demand ) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने केली जात आहे. ( Bjp Demand Nawab Malik Resignation ) अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवसापासून या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने रान उठवलं पाहायला मिळालं. मात्र, नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही यावर महाविकास आघाडी सरकार ठाम ( MVA on Nawab Malik Resignation ) आहे.

मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चा -

राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात उद्या भारतीय जनता पक्षाकडून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली असल्याची माहिती भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिली. मात्र, ही परवानगी देत असताना पोलिसांनी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान एवढ्या परिसरात मोर्चा काढण्याची परवानगी दिली. तसेच या मोर्चाला केवळ भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते येत नाही तर मोठ्या प्रमाणात मुंबईकर देखील उपस्थित राहणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. विधानभवन येथे प्रसारमाध्यमांशी सवांद साधताना आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा - sanjay Raut on ED : ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे

भायखळ्यातील वीर माता जिजाबाई उद्यान ते आझाद मैदान असे मोर्चाचे नियोजन भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या परीक्षा आणि मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानपर्यंत पोलिसांनी मोर्चा काढण्याची विनंती केली. पोलिसांच्या विनंती मान्य करत उद्या होणारा मोर्चा हा मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान इथपर्यंत होईल असे आशिष शेलार यांनी सांगितले.

Last Updated : Mar 8, 2022, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.