ETV Bharat / state

मतदारसंघात आदित्य ठाकरे दाखवा अन् मोफत लसीकरण मिळवा - अतुल भातखळकर - atul bhatkhalkar on aditya thackeray news

आदित्य ठाकरे यांची मुंबई उपनगराच्या पालकमंत्री नेमणूक होऊन आज दीड वर्षे उलटून गेली. या काळात केवळ एक वेळा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांवर कोणतीही कार्यवाही पालकमंत्र्यांकडून करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.

atul bhatkhalkar
अतुल भातखळकर
author img

By

Published : May 24, 2021, 4:51 PM IST

मुंबई - कोरोनासारखी महामारी, निसर्ग, तौक्ते असे दोन चक्रीवादळ, अनेक वेळा अतिवृष्टी होऊन नागरिकांचे हाल होत असतानाही मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून उपनगरात फिरकलेच नाहीत. त्यामुळे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपनगरांत दाखवा व 18-44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण फुकट मिळवा, अशी 'अनोखी' योजनाच मुंबई भाजपच्या वतीने सुरू करत असल्याची घोषणा आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

याबाबत बोलताना भाजप आमदार अतुल भातखळकर

आदित्य ठाकरे यांची मुंबई उपनगराच्या पालकमंत्री नेमणूक होऊन आज दीड वर्षे उलटून गेली. या काळात केवळ एक वेळा जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांवर कोणतीही कार्यवाही पालकमंत्र्यांकडून करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.

आदित्य ठाकरे एसीची हवा खाण्यात मग्न -

मागील वर्षी मे महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ आणि नुकतेच आलेले तौक्ते चक्रीवादळामुळे वर्सोवा, मढ, मार्वे बोरीवली या परिसरातील मच्छीमारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. मालाडमध्ये झाडाची फांदी पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. चाळीमध्ये, झोपडपट्टीमध्ये, इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या घरगुती साहित्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. झाडे पडल्यामुळे 48 तासांपेक्षा अधिक काळ अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. मी स्वतः व भारतीय जनता पार्टीने वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उपनगरांतील लोकांना करण्यात आली नाही. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे हे लोकांना वाऱ्यावर सोडून, घरात बसून एसीची हवा खाण्यात मग्न आहेत, अशी टीकाही भातखळकर यांनी केली.

हेही वाचा - राजभवनात कोणत्या भुताटकीचा वावर वाढला? शिवसेनेचा सवाल

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या मुंबईतील नागरिक अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी तडपडून, होरपळून मृत्युमुखी पडत आहेत. लपूनछपून ताडोबा पर्यटन करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी अशा परिस्थितीत मागील वर्षभराच्या काळात एकाही कोविड केअर सेंटर व रुग्णालयांना भेटी दिल्या नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबई उपनगराच्या नागरिकांसाठी काय काम केले? याचे जनतेला उत्तर द्यावे, असा खडा सवालही आमदार भातखळकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - COVAXIN च्या २ ते १८ वयोगटातील चाचण्या जूनमध्ये, जुलै-सप्टेंबरपर्यंत मिळणार परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.