ETV Bharat / state

सरकारचं काय चाललंय काय?, वीज मोफत देण्यावरून किरीट सोमय्यांची सरकारवर टीका

राज्यातील जनतेला मोफत वीज दिल्यास काय होते, हे नवी दिल्लीतील निकालच सांगतो. नवी दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही घरगुती वीज ग्राहकांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा विचार महाराष्ट्र सरकारमध्ये होत आहे. मात्र, यावर सरकारमधील नेत्यांमध्येच मतमतांतरे असल्याचे दिसत आहे.

mumbai
100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या आश्वासनावरून किरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर टीका
author img

By

Published : Feb 12, 2020, 1:01 PM IST

Updated : Feb 12, 2020, 2:04 PM IST

मुंबई - ऊर्जामंत्री 100 युनिट मोफत वीज देऊ म्हणतात. मात्र, अजित पवार नाही देणार म्हणतात. नितीन राऊत म्हणतात दिल्याशिवाय राहणार नाही. सरकारचं काय चाललंय काय?, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. अलिकडेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा विचार असल्याचे सांगितले. त्यावरून सोमय्या यांनी टीका केली आहे.

100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या आश्वासनावरून किरीट सोमय्यांची ठाकरे सरकारवर टीका

राज्यातील जनतेला 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा विचार असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज देणे हे व्यवहार्य नसल्याचे म्हटले आहे. राज्यातील जनतेला मोफत वीज दिल्यास काय होते, हे नवी दिल्लीतील निकालच सांगतो. नवी दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही घरगुती वीज ग्राहकांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा विचार महाराष्ट्र सरकारमध्ये होत आहे. मात्र, यावर सरकारमधील नेत्यांमध्येच मतमतांतरे असल्याचे दिसत आहे. यावर भाजपच्या किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा -

'कामाठीपुरा समूह पुनर्विकास' म्हाडाच्या माध्यमातून ; गृहनिर्माण मंत्र्यांकडून प्रस्ताव सादरीकरणाचे निर्देश

सोमय्या म्हणाले की, एकीकडे 5 हजार 927 कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला जात आहे. काय मजा चालली आहे ठाकरे सरकारची? ही नौटंकी बंद करा, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 12, 2020, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.