मुंबई - शिवसेनेची महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासूनची बदलती भूमिका आणि हिंदुत्वाची कास यावरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. शिवसेनेच्या उर्दू दिनदर्शिकेवर काही चुका भाजप नेते अतूल भातखलकर यांनी दाखवत शिवसेनेवर टीका केली आहे. सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून उर्दू दिनदर्शिका छापण्यात आली आहे. यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट ऐवजी जनाब, असा उल्लेख शिवसनेने सत्तेच्या लालचेपोटील केल्याचा आरोपही भातखलकर यांनी केला आहे.
पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
मुंबईतील वडाळा नायगाव परिसरात शिवसेनेच्या काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांकडून उर्दू दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये मराठी आणि उर्दू अशा दोन्ही भाषांमध्ये हे दिनदर्शिका आहे. यामध्ये काही मजकूर व तारखा लिखाण ही हिंदुत्वाच्या विरोधात आहे, असे म्हणत भाजपने शिवसेनेवर टीका केले आहे. हिंदुत्वाच्या भाजपने शिवसेनेला हिंदुत्वावरुन कोंडीत पकडण्याच्या प्रयत्न केला आहे.
शिवसेनेला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही
या दिनदर्शिकेच्या वरच्या दोन कोपऱ्यांमध्ये शिवसेना आणि युवासेना, असेही नमूद करण्यात आले आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे हे दिनदर्शिका मराठी, इंग्रजी याचसोबत उर्दू भाषेतही आहे. दिनदर्शिकेवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. याच दिनदर्शिकेचा फोटो पोस्ट करत ‘शिवसेनेला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही’,असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
शिवसेनेने महिनाभरापूर्वी आजान स्पर्धेचे केले होते आयोजन
भाजपचे आमदार व प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी दिनदर्शिका दाखवत म्हटले की, या दिनदर्शिकेत काही मोजके मराठी शब्द वगळता इतर मजकूर ऊर्दू व इंग्रजी भाषेत आहे. त्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे 'जनाब', असे लिहिण्यात आले आहे. याचबरोबर अन्य काही उल्लेखांवरून भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. 'महिन्याभरापूर्वी शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली होती. आता तर त्यांनी बाळासाहेबांच्या नावापुढील 'हिंदुहृदयसम्राट' हे बिरुद देखील काढून टाकले आहे. तारखा, चंद्रोदय, सूर्योदय मुस्लिम दिनदर्शिकेनुसार दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी फक्त 'शिवाजी जयंती', असा एकेरी उल्लेख करण्याचे धाडस केले गेले. याचा आम्ही तीव्र निषेध करतो,'हिंदुरुदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे, असा उल्लेख शिवसेनेने मतांच्या लालसेपोटी केले असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - अॅमेझॉननंतर 'डॉमिनोज'ही मराठीचा वापर करणार, मनसेची मागणी मान्य
हेही वाचा - रात्री 11 आधी पार्टी आटोपण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन; हॉटेल्सना 'ही' सूट