ETV Bharat / state

भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार? अमित शाह बुधवारी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा हट्ट शिवसेनेने कायम ठेवल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल. अशी धक्कादायक माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. येत्या 30 तारखेला भाजपचे अध्यक्ष अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची औपचारिकताही पूर्ण करण्याची शक्यता आहे.

अमित शाह, देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Oct 27, 2019, 9:55 PM IST

मंबई - राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा हट्ट शिवसेनेने कायम ठेवल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल. अशी धक्कादायक माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. येत्या 30 तारखेला भाजपचे अध्यक्ष अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची औपचारिकताही पूर्ण करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप एकटे सरकार कसे स्थापन करते ते पाहू, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे, आमदार सावरकरांनी कृषी अधिकाऱ्यांना केल्या सूचना

विधानसभेचा निकाल लागल्यापासून भाजप-शिवसेना संघर्ष विकापाला गेल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 105 जागा मिळाल्या तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. परंतु, दोन्ही पक्षांमध्ये समसमान अधिकारांचे सूत्र युती करण्याआधी ठरल्यामुळे पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळावे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. भाजपाला ही अट मान्य नाही. शिवसेनेने अन्यथा इतर पर्यायांचा विचार करण्याचा इशारा दिला असला तरी काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षातच बसण्याचे जाहीर केल्यामुळे शिवसेनेची पंचाईत झाली आहे.

अशा परिस्थितीत अपक्ष तसेच इतर लहान पक्षांच्या 20 सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेशिवाय सत्तास्थापनेच्या रणनितीवर आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. मागच्या निवडणुकीत 122 संख्याबळ असलेल्या भाजपने आधी सरकार स्थापन केले. त्यानंतर आपल्या शर्तींवर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले. त्याचप्रमाणे आताही तसे प्रयत्न चालु आहेत.

30 आक्टोबरला अमित शाह मुंबईत -

येत्या 30 ऑक्टोबरला भाजपाचे अध्यक्ष अमित शाह मुंबईत येत आहेत. विधानभवनात दुपारी एक वाजता भाजपच्या आमदारांची बैठक होत आहे. त्यात भाजपाचा विधिमंडळ नेत्याची औपचारीक निवड केली जाईल. यावेळी शाह उपस्थित राहतील. त्यानंतर भाजपचे नेते सर्वात मोठा पक्ष या नात्याने राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करतील, असे कळते.

अमित शाह 30 आक्टोबरला मातोश्रीवरही जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील अशी माहिती मिळत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्यासोबत असतील. त्यामध्ये वाटाघाटी यशस्वी झाल्या तर शिवसेनेला सोबत घेत सरकार स्थापन करतील. अथवा ती एक औपचारिकता ठरेल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील

Intro:भाजपच्या पुन्हा स्वबळाच्या हालचाली; अमीत शहा बुधवारी राज्यपालांची घेणार भेट

mh-mum-01-sena-bjp-gover-7201153

( यासाठी फाईल फुटेज वापरावेत)

मंबई, ता. २७ :

राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा हट्ट शिवसेनेने कायम ठेवल्यास भारतीय जनता पार्टीचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करेल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. येत्या ३० तारखेला भाजपाचे अध्यक्ष अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची औपचारिकताही पूर्ण करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपा एकटे सरकार कसे स्थापन करते ते पाहू, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला असून त्यामुळे महायुतीतल्या या दोन प्रमुख पक्षांमधील संघर्ष विकोपाला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १०५ जागा मिळाल्या तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. परंतु दोन्ही पक्षांमध्ये समसमान अधिकारांचे सूत्र युती करण्याआधी ठरल्यामुळे पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळावे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. भाजपाला ही अट मान्य नाही. शिवसेनेने अन्यथा इतर पर्यायांचा विचार करण्याचा इशारा दिला असला तरी काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षातच बसण्याचे जाहीर केल्यामुळे शिवसेनेची पंचाईत झाली आहे.
अशा स्थितीत अपक्ष तसेच इतर लहान पक्षांच्या २० सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झालेल्या फडणवीस यांनी गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेशिवाय सत्तास्थापनेच्या रणनितीवर आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. मागच्या निवडणुकीत १२२ संख्याबळ असलेल्या भाजपाने आधी सरकार स्थापन केले. त्यानंतर आपल्या शर्तींवर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले. त्याचप्रमाणे आताही तसे प्रयत्न चालु आहेत.
बुधवारी अमित शाह मातोश्रीवर
येत्या ३० ऑक्टोबरला भाजपाचे अध्यक्ष अमित शाह मुंबईत येत आहेत. विधानभवनात दुपारी एक वाजता भाजपाच्या आमदारांची बैठक होत आहे. त्यात भाजपाचा विधिमंडळ नेत्याची औपचारीक निवड केली जाईल. यावेळी शाह उपस्थित राहतील. त्यानंतर भाजपाचे हे नेते सर्वात मोठा पक्ष या नात्याने राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करतील, असे कळते.
याचदिवशी ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्यासोबत असतील. त्यामध्ये वाटाघाटी यशस्वी झाल्या तर शिवसेनेला सोबत घेत सरकार स्थापन करतील. अथवा ती एक औपचारिकता ठरेल, असे सूत्रांनी सांगितले.
---Body:भाजपच्या पुन्हा स्वबळाच्या हालचाली; अमीत शहा बुधवारी राज्यपालांची घेणार भेटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.