ETV Bharat / state

मुंबईत सर्वात महागड्या घराची खरेदी; किंमत ऐकून व्हाल थक्क!

मुंबईमध्ये नुकतेच या वर्षातील सर्वात महागड्या घराचा व्यवहार झाला आहे. एका उद्योगपतीने लोअर परळमध्ये चक्क 136 कोटी 27 लाख किंमतीचे घर खरेदी केले आहे.

biggest deal of Home purchase
अबब..! मुंबईमध्ये तब्बल 136 कोटी रुपयांच्या घराची खरेदी
author img

By

Published : Jun 26, 2020, 10:32 AM IST

मुंबई - काही वर्षांपूर्वी मुंबईच्या बीकेसीमधील एक झोपडी 1 कोटीला विकली गेली होती. एका झोपडीची एवढी किंमत पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतरही मुंबईत महागड्या घरांच्या विक्रीचा सिलसिला सुरूच असून कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात ही कायम आहे. मुंबईमध्ये नुकतेच या वर्षातील सर्वात महागड्या घराचा व्यवहार झाला आहे. एका उद्योगपतीने लोअर परळमध्ये चक्क 136 कोटी 27 लाख रूपये किंमतीचे घर खरेदी केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसाय अडचणीत असताना, इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार होणे बांधकाम क्षेत्रासाठी उत्साह वाढणारी घटना असल्याचे म्हटले जात आहे. नीरज कोचर आणि कनिका ध्रुव कोचर इतके महागडे घर खरेदी केले आहे. नीरज कोचर हे विराज प्रोफाइल लिमिटेडचे अध्यक्ष असून, ही कंपनी भारतातील स्टेनलेस स्टील निर्मितीतील आघाडीची कंपनी आहे. त्यांनी लॉकडाऊन सुरू होण्याआधी दोन ते तीन दिवस आधी घर खरेदीची नोंदणी केली आहे.

लोअर परळमधील इंडिया बुल्स ब्लु या टॉवरमधील 4 फ्लॅट कोचर कुटुंबाने खरेदी केले आहेत. फ्लॅट क्रमांक 46, 47, 48 आणि 49 असे हे फ्लॅट असून, एकूण घराचे क्षेत्रफळ 21 हजार 4 चौ. फूट इतके आहे. त्यानुसार हे घर प्रति चौ. फूट 64 हजार 878 रुपये अशा किमतीत विकले गेले आहे. तर यासाठी त्यांनी 8 कोटी 17 लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क भरले आहे. याआधी 2018 मध्ये नीरज बजाज यांनी वरळीत 120 कोटींचे घर खरेदी केले होते. तर 2019 मध्ये सर्वात मोठा व्यवहार आर के स्टुडिओचा झाला होता. ही विक्री 250 कोटीत झाली होती. तर आता 2020 मधील सहा महिन्यातील ही सर्वात मोठी आणि महागडी घरखरेदी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.