ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तांत्रिक आणि डिझाईनकामासाठी बोली उघडण्यात आली

मोदी सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन ( Modi government ambitious project ). या प्रकल्पासाठी प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक करत मार्ग पूर्ण करण्याचे काम भारत शासन महाराष्ट्र शासन आणि परकीय कर्ज अशा तिन्ही मिळून निधी उभारला जातोय. यासंदर्भातल्या कामासाठी तांत्रिक आणि डिझाईनबाबत बोली आज उघडण्यात ( technical and design work Bidding ) आली.

Mumbai Ahmedabad bullet train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन
author img

By

Published : Nov 5, 2022, 9:24 AM IST

मुंबई : मोदी सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन ( Modi government ambitious project ). या प्रकल्पासाठी प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक करत मार्ग पूर्ण करण्याचे काम भारत शासन महाराष्ट्र शासन आणि परकीय कर्ज अशा तिन्ही मिळून निधी उभारला जात आहे. यासंदर्भातल्या कामासाठी तांत्रिक आणि डिझाईनबाबत बोली आज उघडण्यात ( technical and design work Bidding ) आली.

Mumbai Ahmedabad bullet train
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन

बारा स्थानकांवर थांबा : एकूण ५०८ किमी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे बुलेट ट्रेनची स्थानके (Mumbai Ahmedabad Bullet Train ) असतील. अत्याधुनिक रीतीने मुंबई ते अहमदाबाद रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे मात्र भूसंपादन पूर्णतः झालेले नाही. या मार्गावरील गाड्यांचा कमाल वेग प्रतितास ३५० किलोमीटर असेल. ५०८ किमीचे अंतर २ तास ७ मिनिटांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. सर्व बारा स्थानकांवर थांबल्यास २ तास ५८ मिनिटे लागतील.

प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकेल : मार्गाच्या बांधणीचा एकूण खर्च ९ खर्व, ७६ अब्ज, ३६ कोटी (९,७६,३६ कोटी) रुपये आहे.त्यापैकी जपान सरकारच्या जायका या संस्थेकडून ७९,१६५ कोटींचे कर्ज मिळणे अपेक्षित आहे. या कर्जावर फक्त ०.१ टक्के व्याजदर आकारला जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंधरा वर्षांनी परतफेड चालू होईल आणि ती ३५ वर्षे चालेल. परतफेडीचा कालावधी पन्नास वर्षांचा आहे. इ.स. २०२३-२४ पर्यंत बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य केल्यास २०४० सालापासून परतफेड चालू होईल आणि तेव्हा मासिक हप्‍ता सुमारे दोनशे कोटी रुपये असेल. मात्र आजच माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाने त्यात म्हटलेले आहे की कोणत्याही टाइम लाईनमध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार नाही भूसंपादन जर पूर्ण झाले तरच हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकेल.

आज बोली उघडण्यात आली : बीकेसी एचएस आर स्टेशनचे डिझाईन आणि बांधकामसाठी तांत्रिक बोलीला आधी मुदतवाढ मिळाली. अखेर आज बोली उघडण्यात आली. चार निविदाकारांनी त्यांच्या निविदा सादर केल्या आहेत. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड तर दुसरी जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड तर अफकॅन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तसेच एमईआयएल -एचसीसी ह्या कंपन्यांनी निविदा सादर ( Tender submission from Larsen & Toubro Limited) केल्या. "ह्या बाबत संयुक्त उपक्रम तांत्रिक मूल्यमापन प्रक्रिया झाल्यानंतर, तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीदारांसाठी आर्थिक निविदा उघडल्या जातील." असे राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळ प्रवक्ता सुषमा गौर यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.